Home चंद्रपूर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे 22 ऑगस्टला चंद्रपुरात होणार जंगी स्वागत.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे 22 ऑगस्टला चंद्रपुरात होणार जंगी स्वागत.

जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या संभावित उमेदवारांची होणार चाचपणी. जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र सैनिकांना येण्याचे आवाहन.

चंद्रपूर :-

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची नवनिर्माण यात्रा ही विदर्भात सुरु झाली असून दिनांक 22 ऑगस्टला त्यांचे चंद्रपूर शहारात आगमन होणार आहे, सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 च्या दरम्यान त्यांचे गडचिरोलीवरून चंद्रपुरात प्रस्थान होणार असून सगळ्या महाराष्ट्र सैनिकांकडून त्यांचे शहरातील पाण्याची टाकी जवळ जंगी स्वागत करण्याची जोरात तयारी आहे. स्वागतानंतर त्यांचा ताफा एंडी हॉटेल मध्ये जाणार, या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व विधानसभा निहाय बैठक होणार आहे व संभावित उमेदवार यांची चाचपणी सुद्धा होणार आहे, दरम्यान या बैठकीत मनसे सरचिटणीस तथा शेतकरी सेनेचे प्रांताध्यक्ष संतोष नागरगोजे हे आजचं या बैठकीच्या अनुषंगान आढावा घेण्यासाठी येणार आहे.

काही दिवसापूर्वी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्वे करण्यात आला होता व त्यानंतर पक्षाचे निरीक्षक यांच्या कडून संभावित उमेदवाराची चाचपणी करण्यात आली होती व त्यांनतर मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचा हा दौरा असून या दौऱ्यात संभावित उमेदवारांकडून लेखाजोखा घेण्याची शक्यता आहे. अनेक पक्षातील संभावित उमेदवार हे मनसे कडे येण्यास इच्छुक आहे, दरम्यान या पक्षाच्या आढावा बैठकीला चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्र सैनिक व पदाधिकाऱ्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मनसे जिल्हा अध्यक्ष राहुल बालमवार, मनदीप रोडे, अंगीकृत संघटनेचे सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.

राजसाहेब ठाकरे हे 22 ऑगस्टलाच सायंकाळी चंद्रपूर वरून घुग्गुस मार्गे वणी येथे जाणार आहे व दुसऱ्या दिवशी वणी वरून वरोरा मार्गे ते जाणार असल्याने वरोरा येथे त्यांचे पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकारी यांच्या कडून रत्नामाला चौक वरोरा येथे स्वागत होणार असल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here