अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी
भद्रावती तालुक्यातील राळेगाव, मनगाव, थोराना, नागलोन, पाटाळा,कुचना, कोंढा, शेंबळ (वरोरा) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमध्ये तसेच पाटाळा विद्यलयात बुक व साहित्य वाटप
चंद्रपूर :- दि,२१/०८/२०२४,विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना या प्रक्रियेत मदत करणारे शिक्षक यांचे बंध- अनुबंध चैतन्यपूर्ण स्वरुपाचे हवेत. शिक्षकाला मातीची भांडी घडविणाऱ्या कलाकाराची भूमिका निभावताना विद्यार्थ्यांवर सुसंस्कार, नीतमूल्य, सकारात्मक जीवनदृष्टी यांची सुंदर नक्षी उमटवायची आहे. त्यातूनच उद्याचे आदर्श नागरिक घडणार असून देशाचे भवितव्य ठरविणार आहेत. प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्र तेज, बुद्धी आणि वृत्ती जपणारा असतो. त्याचा कल शिक्षकाने समजावून घेतला पाहिजे. शिक्षकाने विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरून त्याच्या व्यक्तीमत्वाला आकार द्यायचा असतो असे मत राळेगावचे प्रतिष्ठित नागरिक सामाजिक कार्यकर्ते बंडू पाटील थेरे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघ मर्यादित, महाराष्ट्र संचालक तथा चंद्रपूरचे माजी सभापती काँग्रेस नेते दिनेशभाऊ चोखारे यांच्या मार्गदर्शनात भद्रावतीचे माजी तालुका अध्यक्ष शंखर खैरे उपस्थित भद्रावती तालुक्यातील राळेगाव, मनगाव, थोराना, नागलोन, पाटाळा, कुचना, कोंढा, शेंबळ (वरोरा) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमध्ये तसेच पाटाळा विद्यलयात बुक व साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी बोलतांना पुढे म्हणालया कि शिक्षकांचे वक्तीमत्व जेवढे प्रभावी, परिणामकारक, ज्ञान समृद्ध असेल तेवढे ते विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असते. आजची आव्हाने आणि भविष्यातील समस्या यांना सामारे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविणे हे शिक्षकांनी आपले ध्येय समजले पाहिजे. स्वतःमधील उणिवा जाणीवपूर्वक दूर करणारा शिक्षकच आपले अध्यापनाचे कार्य अधिक प्रभावी, रंजक आणि सुलभपणे करू शकतो.
भद्रावती तालुक्यातील राळेगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापीका सौ. शालिनी जोगी, शिक्षिका माधुरी मडावी, कमलेश खामणकर, रवींद्र थेरे यांची मनगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक प्रकाश हक्के, सरपंच सुनील खामणकर, शाळा समिती अध्यक्ष संदीप चोपणे, शिक्षिका तुराणकर, प्रतिष्ठित नागरिक प्रशांत वांढरे,
थोराना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापक अरुण उमरे, शिक्षक ध्यानेश्वर वाभीटकर, शंकर बावणे, महेश भट्ट, नागलोन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापक गणेश चिडे, शिक्षिका आशा जोगी, अंकित महाडोळे, रुपेश गेडाम, पाटाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याधापक रविकांत टोंगे, गजानन बोन्डे, गिरीधर पिपळशेंडे, पाटाळा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक रविकांत टोंगे,
कुचना येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक संजय विरमलवार, शिक्षक सतीश बुरांडे, शिक्षिका संध्या पिपळकर, वर्षा बल्की, समिती अध्यक्ष तिरुपती महाडोळे, पाटाळा येथीलग्रामविकास विद्यालय येथील मुख्याध्यापक वामन आवारी, शिक्षक हरणे सर, झाडे सर, शिक्षिका मुद्दलवार मॅडम , ठमके मॅडम, कोंढा येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक मुकुंद देशमुख, शिक्षिका भाग्यश्री कामडी, नाजिया कुरेशी, शिक्षक हर्षलकुमार उराडे, आशिष चुनारकर, तर वरोरा तालुक्यातील शेंबळ येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत मुख्याधापक रामभाऊ ढुमोरे, शिक्षिका सौ. भटकर, शिक्षक प्रदीप ढोके, प्रवीण पवार आदींची यांचेसह तसेच शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचारी उपस्थित होते.