Home चंद्रपूर सनसनी:- चंद्रपूर विधानसभेत कांग्रेस ची उमेदवारी मागणारे माजी पोलीस निरीक्षक अंबोरे यांच्या...

सनसनी:- चंद्रपूर विधानसभेत कांग्रेस ची उमेदवारी मागणारे माजी पोलीस निरीक्षक अंबोरे यांच्या चितरकथा?

ज्यांनी आपल्या पोलीस सेवेत कधी समाजहित जोपासलं नाहीं ते चक्क लोकप्रतिनिधीच्या स्पर्धेत कुणाच्या आशीर्वादाने ?

चंद्रपूर :-

जिल्ह्यातील ब्रह्मपुरीचे वादग्रस्त ठरलेले ठाणेदार सुधाकर अंभोरे यांना सेवानिवृत्तीनंतर आमदार बनण्याचे डोहाळे लागले असून त्यांची मुंबई वारी कांग्रेस प्रदेश कार्यालयात झाली आणि तिथेच वादाची ठिणगी पडली, गेल्या कित्तेक वर्षांपासून कांग्रेस मध्ये अविरतपणे सेवा देणारे कार्यकर्ते बाजूला सारून ज्यांचा कांग्रेस पक्षाशी दुरान्वये कुठलाही संबंध नसताना ऐनवेळी पक्षाला चांगले दिवस आले असतांना अवैध मार्गाने कामावलेल्या पैशाच्या बळावर राजकारणात उडी घेऊन चक्क आमदार बनण्याचे स्वप्नं बघणारे अंबोरे यांच्या पोलीस दलातील चितरकथा बघितल्या तर हे पोलीस कर्तव्यावर कमी आणि वसुलीत जास्त व्यस्त असल्याच्या तक्रारी चक्क जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे अनेकवेळा गेल्या आणि प्रसारमाध्यमात त्यांना वादग्रस्त पोलीस अधिकारी म्हणून शिक्का लागला, पण आता सेवानिवृत्तीनंतर कामावलेल्या पैशातून राजकारणं करण्याचं वेड त्यांना कुणी लावलं हे कळायला मार्ग नसून जर त्यांच्या पोलीस दलातील सेवा काळातील चितरकथा मांडल्या तर त्यांची उमेदवारी एका दिवसात खल्लास होईल अशी परिस्थिती दिसत आहे.

अंबोरे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांचे सट्टाकिंगच्या वाहनातील प्रवासाचे किस्से जिल्ह्यात सर्वत्र चर्चील्या गेले, त्या दरम्यान अंभोरे एक दिवसापूर्वी पोलिस खात्याच्या सेवेतून निवृत्त झाले असतांना वणी येथील सट्टाकिंग हाफीज रहेमान यांच्या वाहनातून त्यांचा प्रवास हा प्रसारमाध्यमाच्या लक्षात आला आणि अंबोरे यांचे अवैध धंदेवाल्याशी असलेले अर्थपूर्ण मैत्रीचे संबंध उघड झाले होते, दरम्यान काही वर्तमान पत्राच्या बातम्यामुळे व त्यांच्यावरील न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने सेवानिवृत्तीचे अखेरचे सरकारी पैसे रखडले असल्याची बाब चर्चेत होती, मात्र सेवानिवृत्तीपूर्वी गडगंज संपत्ती कामावलेल्या अंबोरे यांना त्याचा काहीएक फरक पडला नाही, कारण त्यांनी त्यांच्या सेवाकाळात जो मेवा कामावला तोच दोन पिढ्या खाईल एवढा असल्याची चर्चा आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना अंभोरे घुग्घुस पोलिस ठाण्यात कार्यरत होते. तेव्हा त्यांच्या कार्यपद्धतीची बरीच चर्चा व्हायची. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची सूत्र त्यांच्याकडं देण्यात आली. शहर पोलिस ठाण्यातही ते कार्यरत होते, दरम्यान अंभोरे यांची यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील हाफीज रहेमान यांच्यासोबत मैत्री झाली. हाफीजवर अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीचं वाहन अंभोरे यांनी का वापरले, असा प्रश्न तेंव्हा निर्माण झाला होता, मात्र सेवानिवृत्तीच्या दोन दिवस आधी अंभोरे यांनी एका ट्र्रॅव्हल्स चालकाला मारहाण केली. त्यावेळी ते एका खासगी वाहनात होते. हे वाहन हाफीज रहेमानचे निघाले आणि अंभोरे यांचे बिंग फुटले. हाफीजच्या नावावर अंभोरे यांची आणखी दोन वाहनं असल्याची माहिती पण समोर आली होती.

अंबोरे यांच्यात असं काय आहे की त्यांना कांग्रेस ने उमेदवारी द्यावी?

कुठलाही पोलीस अधिकारी हा मनानं तर ताकतवर असतोच पण तो शरीराने सुद्धा ताकतवर असतो, मात्र अंबोरे यांच्या बाबतीत उलटी गंगा वाहत आहे, मुळात कुठलाही राजकीय पिंड नसणारे अंबोरे यांच्याकडे बघितलं तर ते जणू थकल्यासारखे वाटतात आणि बॉडी लँग्वेज पण एखाद्या भारदस्त नेत्यासारखी वाटतं नाहीं, तसं तर राजकारणात अनेक लोकं असेच खपतात ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यात अंबोरे मागे कसे राहणार, पैसे आहे लढायला म्हणून निवडणूक लढायची तयारी त्यांनी केली खरी पण त्यांचं कांग्रेस पक्षांकारिता योगदान ते काय? याचा विचार पक्षाचे वरिष्ठ करतीलच पण ज्यांचा पोलीस अधिकारी म्हणून वादग्रस्त कारभार राहिला त्यांचा राजकारणात कुठला चांगला राहणार असे राजकीय विश्लेषकांना वाटतेय त्यामुळे कांग्रेस पक्षांकडून त्यांना उमेदवारी देण्यासाठी पक्षांर्गत मोठा विरोध होईल अशीच शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here