Home चंद्रपूर साईनगर हनुमान मंदिर संकुलात लावलेल्या झाडांना पाईपने संरक्षण

साईनगर हनुमान मंदिर संकुलात लावलेल्या झाडांना पाईपने संरक्षण

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

साई प्लंबिंगचे मालक नीलेश लोणेरे यांनी पाईप मोफत उपलब्ध करून दिले…..

चंद्रपूर  :– साईनगर हनुमान मंदिर संकुलात लावन्यात आले झाडांना आपल्या पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या हिरव्यागार जागांचे संरक्षण करण्यासाठी समुदायाच्या सहभागाचे महत्त्व पटवून देत या भागातील नागरिकांनी मोकळ्या जागेत विविध प्रकारची झाडे लावली होती,

ज्याची स्थानिक नागरिकांकडून चांगल्या प्रकारे निगरााणी राखली जात होती. मात्र येथील भटकी जनावरे आणि काही वाहनचालकांच्या पार्किंगमुळे या झाडांचे नुकसान होत होते.

त्यामुळे साई प्लंबिंगचे मालक नीलेश लोणेरे यांनी ही परिस्थिती पाहून झाडांची काळजी घेण्याचा निर्णय घेतला. ते आदिस शांत स्वभावाचे व दयाळू सोबत अग्रेसर सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचे या समाजात एक वेगळीच ओळख आहे,

आणि याच कारणाने त्यांनी पुन्हा एक सामाजिक पाऊल उचलत साईनगर हनुमान मंदिर संकुलात लावलेल्या झाडांना संरक्षणासाठी पाईप देऊन त्यांनी झाडे पाईपने सुरक्षित केली आहेत.

आता या झाडांना नुकसान तर होणार नाही परंतु या झाडाचे संगोपन होऊन हे झाड खूप मोठे होईल हे मात्र नक्की आणि त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल साईनगर हनुमान मंदिराच्या वतीने व या भागातील नागरिकांनी निलेश लोणेरे यांचे आभार मानले असून त्यांच्या कार्याचे सर्वत कौतुक केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here