Home चंद्रपूर भयावह :- वरोरा तालुक्यात केळी गावाला स्मशानभूमीकडे जाणारा पांदन रस्ताचं नाहीं?

भयावह :- वरोरा तालुक्यात केळी गावाला स्मशानभूमीकडे जाणारा पांदन रस्ताचं नाहीं?

पावसाळ्यात अत्यंयात्रा कशी जात असेल? याचे चित्ताथरारक दृष्य न पाहिलेलेच बरे.

माढेळी :-

वरोरा तालुक्यातील माढेळी या बाजारपेठे अंतर्गत येणाऱ्या केळी या गावातील शेतात जाणाऱ्या पांदन रस्त्याची पूर्णतः वाट लागली असून स्मशानभूमिकडे जाणारा रस्ता सुद्धा अंत्ययात्रेतील लोकांना मरण यातना देणारा ठरत असल्याचे भयावह दृष्य दिसत असल्याने या भागातील तत्कालीन जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, आमदार, खासदार हे नेमके कुठल्या बिळात झोपले असावे असा गम्भीर प्रश्न उपस्थित होतं आहे.

केळी या गावातुन नदीजवळ असणाऱ्या स्मशानात जाण्यासाठी रस्ताच नाही. हे अंतर जवळपास 800 मिटर आहे. तसेच बर्याच शेतकर्यांचे शेतीला पण तोच रस्ता जातो. मागील 10 वर्ष पासून आमदार, खासदार यांच्याकडे या रस्त्याची मागणी करुन आता गावकरी थकले आहे, त्यामुळे आता त्या स्मशानभूमीच्या रस्त्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आंदोलन केल्याशिवाय पर्याय नाहीं आणि ते आंदोलन आम्ही करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ झापर्डे व सर्व केळी वासी यांनी प्रशासनाला दिला आहे.

लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या संवेदना मेल्यात का?

केळी या गावाच्या स्मशानभूमिकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बघितली तर कुठलाही सुज्ञ नागरिक संतापेल अशी विदारक परिस्थिती आहे, पण ज्या प्रशासनाच्या हातात हे सगळं व्यवस्थित करण्याचं काम आहे त्या प्रशासनाच्या संवेदना मेल्यात का हा प्रश्न उपस्थित होतं आहे, नवनिर्वाचित खासदार यांनी निवडणुकीत आश्वासन सुध्दा दिले होते की हा पांदन रस्ता निवडून आल्यानंतर लवकरच करेन पण त्यांचे सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतांना दिसत आहे, त्यामुळं निगरगट्ट प्रशासन आणि दृष्टीहीन लोकप्रतिनिधी यांच्यामुळे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यासाठी पांदन रस्ता व्हावा यासाठी आंदोलनच करावे लागेल अशी परिस्थिती दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here