Home चंद्रपूर धक्कादायक :- सीएसटीपीएस प्रशासनाने वीज निर्मिती संघटना संयुक्त कृती समितीला केले बेदखल.

धक्कादायक :- सीएसटीपीएस प्रशासनाने वीज निर्मिती संघटना संयुक्त कृती समितीला केले बेदखल.

बैठकीत झालेले निर्णय बदलवून भलतेच परिपत्रक काढल्याने वीज निर्मिती कर्मचारी संघटना आक्रमक.ते परिपत्रक रद्द करण्याची मागणी 

चंद्रपूर :-

सीएसटीपीएस प्रशासनाचा सावळा गोंधळ नेहमीच चर्चेचा विषय ठरत असून दि. १२ जुलै २०२४ ला सर्व संघटना प्रतीनिधी व सीएसटीपीएस व्यवस्थापन यांच्यात बैठक आली होती, त्या बैठकीत उर्जानगर वसाहतीमधील गाळावाटप व गाळा बदली प्रक्रीया सुधार करण्याबाबत चर्चा करण्यात आली, परंतु दि. 15/7/2024 ला व्यवस्थापनाने जे परिपत्रक काढले ते बैठकीत झालेल्या चर्चेच्या विपरीत असून बैठकीत झालेली चर्चा व परिपत्रक यामध्ये खूप तफावत आहे. म्हणजेच स्थानिक व्यवस्थापन संघटनेला तसेच कृती समितीला दुय्यम प्रतीची वागणुक दिल्या जातं असल्याची भावना कर्मचारी संघटनेच्या नेत्यांची असल्याने आता प्रशासनाची एकाधिकारशाही मोडीत काढण्यासाठी कर्मचारी संघटना आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे.

सीएसटीपीएस मधील महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने व विद्युल क्षेत्र तांत्रीक कामगार युनियन ने स्थानिक व्यवस्थापनाला पत्र दिले होते. मात्र त्यांच्या मागणी कडे व्यवस्थापन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करित आहे. दरम्यान आजपर्यंत व्यवस्थापनाने संघटनेला चर्चेसाठी बोलाविले नाही किंवा पत्राचे उत्तरही दिले नाहीं खरं तर संघटना त व्यवस्थापन मिळून कंपनी व कामगार कर्मचारी यांच्या फायद्यायाठी निर्णय घ्यायचे असतात. संघटना व्यवस्थापणाच्या चांगल्या निर्णयाचे स्वागत करित असते. परंतु व्यवस्थापन संघटनांच्या मागणीकडे दुर्लक्ष करित आहे हे व्यवस्थापनाने दि. १५/०७/२०२४ ला काढलेले परिपत्रकावरून स्पष्ट होते. सदर परिपत्रकानुसार कर्मचारी कामगार यांना न्याय मिळू शकत नाहीं त्यामुळे हे परिपत्रक रद्द करून दोन्ही संघटनांसोबत पुन्हा चर्चा करून बैठकीत ठरल्याप्रमाणे परिपत्रक काढण्यात यावे. अन्यथा महाराष्ट्र वीज कामगार महासंघ व वि. क्षे. तांत्रिक कामगार युनियन ला क्रमबद्ध साखळी उपोषण करावे लागेल असा इशारा सीएसटीपीएस प्रशासनाला दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here