Home Breaking News “श्री नवयुवक बाल गणेश मंडळाच्या वतीने किल्ला स्वच्छता अभियानात सहभाग

“श्री नवयुवक बाल गणेश मंडळाच्या वतीने किल्ला स्वच्छता अभियानात सहभाग

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  महानगरपालिका चंद्रपूर मार्फत दरवर्षी पर्यावरण पूरक गणेश मंडळ स्पर्धा आयोजित केली जाते, यामध्ये श्री नवयुवक बाल गणेश मंडळ, दत्त नगर, नागपूर रोड, चंद्रपूर यांनी मागील चार वर्षांपासून प्रथम क्रमांक पटकावला आहे. यावर्षीही मंडळाने स्पर्धेत सहभाग घेत किल्ल्याची स्वच्छता आयोजित केली होती.

मंडळाच्या सदस्यांनी पठाणपुरा संकुलातील किल्ल्याची स्वच्छता करून हेरिटेज वॉकसाठी तयार करण्यात येत असलेल्या मार्गाची स्वच्छता केली. मंडळाचे सर्व अधिकारी, सदस्य व कार्यकर्त्यांनी या कामात उत्साहाने सहभाग घेऊन किल्ला स्वच्छतेचे काम यशस्वीपणे पूर्ण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here