Home Breaking News पिस्तूल व तलवार लपवून ठेवणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त युवकास अटक…..

पिस्तूल व तलवार लपवून ठेवणाऱ्या विधिसंघर्षग्रस्त युवकास अटक…..

अतुल दिघाडे
जिल्हाप्रतिनिधी

चंद्रपूर  :-  कोरपना, गडचांदूर येथील बंगाली कॅम्पमधील एका युवकाला पिस्तूल व तलवारीसह गुरुवारी (दि. १९) पोलिसांनी अटक केली. अभिषेक शत्रुघ्न सिंग (२२) असे आरोपीचे नाव आहे.

बंगाली कॅम्पमधील रहिवासी अभिषेक सिंग हा घरी अवैधरीत्या हत्यार बाळगुन असल्याची माहिती ठाणेदार शिवाजी कदम यांना मिळाली. पोलिसांचे पथक घेऊन घराची झडती केली असता आरोपी अभिषेकने स्टोअर रूममध्ये सज्जावर एक लोखंडी तलवार, लोखंडी कोयता व पिस्तूल असे अवैध शस्त्र लपवून ठेवल्याचे आढळले. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३,४,२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

News reporter :- अतुल दिघाडे

जुनोनातील बालकाकडून तलवार जप्त

बल्लारपूर पोलिसांनी मंगळवारी (दि. १७) जुनोना येथील विधिसंघर्षग्रस्त आरोपीकडून एक लोखंडी धारदार तलवार जप्त केली. गणेश विसर्जनानिमित्त बल्लारपूर पोलिस गस्त करताना जुनोना येथे एक विधिसंघर्षग्रस्त बालक विसर्जनादरम्यान लोकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तलवार बाळगून असल्याची माहिती मिळाली.

आरोपीस ताब्यात घेऊन वडिलासमक्ष घराची झडती घेतले असता झोपडीत लाल रंगाच्या म्यानमध्ये एक लोखंडी तलवार आढळून आली. पोलिसांनी विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ४,२५ भा. ह. का. अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here