Home चंद्रपूर चिंतनीय :- उमेदवारीसाठी भीक मागणाऱ्या किशोर जोरगेवार यांना जनता मतांची भीक देईल...

चिंतनीय :- उमेदवारीसाठी भीक मागणाऱ्या किशोर जोरगेवार यांना जनता मतांची भीक देईल का?

चंद्रपूर विधानसभा मतदार संघात कांग्रेसच्या प्रवीण पडावेकर यांची अपक्ष उमेदवारं ब्रुजभूषण पाझारे यांच्याशी लढत.

चंद्रपूर :-

चंद्रपूर विधानसभा क्षेत्र हे भाजपचे हक्काचे क्षेत्र राहिले आहे, इथे 1995 पासून भाजप जिंकत आहे, पण मागील निवडणुकीत भाजप बाहेरच्या माणसाला उमेदवारी देतो म्हणून भाजप मध्ये अनेक वर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी म्हणून आमदार नाना शामकुळे यांना येथील भाजप कार्यकर्ते आणि जनतेनी बाहेरचा रस्ता दाखवत किशोर जोरगेवार या अपक्ष असलेल्या उमेदवाराला मोठ्या मतधिक्याने निवडून दिले आणि भाजप ची जिंकण्याची सततची शृंखला मोडीत काढली होती, दरम्यान किशोर जोरगेवार यांनी ज्या मुद्द्यावर निवडणूक जिंकली त्या मुद्द्याला पायदळी तुडवून भलतेच कार्यक्रम हाती घेऊन येथील जनतेचा जो भ्रमनिराश केला तो आता किशोर जोरगेवार यांच्या अंगलट येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कारण उमेदवारीसाठी या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा मोह घेऊन उमेदवारीची भीक मागणाऱ्या किशोर जोरगेवार यांना आता जनता मतांची भीक देईल का? हा मोठा चिंतनीय प्रश्न आहे. दरम्यान कांग्रेस उमेदवार प्रवीण पडवेकर यांची अपक्ष उमेदवार ब्रुजभूषण पाझारे यांच्याशी जोरदार लढत होण्याचे नवे राजकीय समीकरण बनले असल्याची चर्चा आहे.

किशोर जोरगेवार यांना तसा राजकीय वारसा नाही पण राजकीय नेत्यांचे गुण सुद्धा नाही, एका परिपक्व नेत्याला साजेशे गुण त्यांच्यात नाही तर केवळ गावाखेड्यातील पांचट नेत्यांसारखे त्याचे वागणे हे काही लोकांना भावत असले तरी जनतेच्या जिवंत आणि ज्वलंत प्रश्नांना त्यांनी वाचा फोडून जनतेला न्याय मिळवून दिला नसल्याने त्यांची संधीसाधू प्रतिमा जनसामान्य माणसाच्या मनात निर्माण झाली असे चित्र दिसत आहे. सन 2014 ला लाचार होऊन शिवसेने कडून लढलेल्या जोरगेवार यांनी शिवसेना सोडून स्वतःचे चांदा ब्रिगेड संघटन उभे करून व जनतेला 200 युनिट फ्री मिळवून देतो हे कैपनिंग राबवून सन 2019 ची निवडणूक जिंकली, मात्र आता जनतेला दिलेले आश्वासन फसले म्हणून कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना शिंदे गट व नंतर भाजप पक्षांकडे उमेदवारी मिळविण्यासाठी कोलांटउड्या घेणाऱ्या जोरगेवार यांना भाजप ने उमेदवारी दिली आणि हक्काचा कार्यकर्ता ब्रिजभूषण पाझारे यांना डावलल्या गेले त्यामुळे आता भाजप च्या कार्यकर्त्यात कमालीचा असंतोष असून नाना शामकुळे सारखी जोरगेवार यांची अवस्था होईल असे राजकीय चित्र आहे.

का होत आहे पडवेकर विरुद्ध पाझारे लढत?

उमेदवारी अर्ज भरल्यानंतर कांग्रेस पक्षाने प्रवीण पडवेकर हा डमी उमेदवार दिला असल्याची ओरड सर्वत्र होत होती तर भाजप बंडखोर ब्रुजभूषण पाझारे हे अपक्ष उमेदवार रिंगणात टिकू शकणार नाही असा समज निर्माण झाला होता, मात्र कांग्रेस पक्षात झालेली एकजूट आणि प्रचार संभाचा व रैली चा धडाका यामुळे कांग्रेस उमेदवार मुख्य लढतीत आला असून कॉर्नर संभाच्या माध्यमातून ब्रुजभूषण पाझारे यांचा सतत जनतेशी होत असलेला सवांद यामुळे त्यांनी सुद्धा प्रचारात आघाडी घेतल्याने मुख्य लढत ही कांग्रेसचे प्रवीण पडवेकर विरुद्ध अपक्ष ब्रुजभूषण पाझारे अशी होणार असल्याचे राजकीय चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here