Home Breaking News विधानसभा निवडणुकीत तणाव: सुधीर मुनगंटीवार यांना काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांची धक्काबुक्की

विधानसभा निवडणुकीत तणाव: सुधीर मुनगंटीवार यांना काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांची धक्काबुक्की

विधानसभा निवडणुकीत तणाव: सुधीर मुनगंटीवार यांना काँग्रेस उमेदवाराच्या समर्थकांची धक्काबुक्की

बल्लारपूर  :-  बल्लारपूर  विधानसभा मतदारसंघातील विधानसभेच्या निवडणुकीसाठी पार्श्वभूमीवर तणाव निर्माण झाला आहे. राज्याचे वने, सांस्कृतिक आणि मत्स्य व्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यावर काँग्रेस उमेदवार संतोष रावत यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मूल तालुक्यातील कोसंबी येथे घडला, त्यावेळी मुनगंटीवार तलावाच्या समस्यांवर कार्यकर्त्यांशी चर्चा करत होते.

News reporter :- अतुल दिघाडे

घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनुसार, काँग्रेसचे विजय चिमड्यालवार व राकेश रत्नावार यांना ग्रामस्थ महिलांकडून मारहाण झाली. याच वेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरुनुले यांचा चष्मा फुटल्याचीही माहिती मिळाली.

घटनास्थळी उपस्थित असलेले सुरक्षारक्षक हे त्वरित हस्तक्षेप करत मुनगंटीवार यांच्यावर हल्ला होण्यापासून बचाव करण्यात यशस्वी ठरले. मुनगंटीवार यांनी काँग्रेस उमेदवारांना शांततेने समजावण्याचा प्रयत्न केला, पण काही काँग्रेस समर्थकांनी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला.

यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार यांनी पोलिसांची तातडीने मदत मागितली आणि घटनास्थळ सोडण्यास नकार दिला. त्याच वेळी, काँग्रेस समर्थकांनी भाजप कार्यकर्त्यांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली.

सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेनंतर राजकीय वातावरण ताणले गेले आहे. मुनगंटीवार हे संयमी आणि सुसंस्कृत राजकारणी म्हणून ओळखले जातात, आणि त्यांच्या विरोधात घडलेल्या या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here