Home Breaking News चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 64.48 टक्के मतदान

चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 64.48 टक्के मतदान

चंद्रपूर जिल्ह्यात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 64.48 टक्के मतदान

चंद्रपूर  :-  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या दिवशी, चंद्रपूर जिल्ह्यात सकाळपासून मतदानाला उत्साहाने सुरुवात झाली, तरी सुरुवातीला मतदानाची गती संथ होती. दुपारी 3 वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण 49.87 टक्के मतदान झाले होते, पण 3 वाजेपासून मतदानामध्ये गती आली आणि मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली. सायंकाळी 5 वाजेपर्यंत एकूण 64.48 टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

चंद्रपूर जिल्ह्यातील विविध विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदानाचे प्रमाण वेगवेगळे होते. सर्वाधिक मतदान चिमूर विधानसभा क्षेत्रात 74.83 टक्के झाले, तर ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात 72.97 टक्के मतदान नोंदवले गेले. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात 53.57 टक्के, बल्लारपूर मध्ये 63.44 टक्के, राजुरा मध्ये 65.59 टक्के आणि वरोरा विधानसभा क्षेत्रात 60.21 टक्के मतदान झाले.

दुपारी मतदानाच्या गतीत वाढ झाल्यानंतर, अंतिम तासात मतदानाची टक्केवारी आणखी वाढू शकते. या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात 94 उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मशीनमध्ये बंद होणार आहे, आणि 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल.

सर्व उमेदवारांनी मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला असून, आता चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा मतदानावरचा उत्साह स्पष्टपणे दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here