पराभवावर “अविश्वसनीय” असं सूचक वक्तव्य करून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची चिंतनीय अशी प्रतिक्रिया.
लक्षवेधक :-
महाराष्ट्राचं उज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी, महाराष्ट्राचं नवनिर्माण करून जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडविण्यासाठी महाराष्ट्राचा विकास आराखडा जनतेसमोर ठेऊन ‘माझ्या हाती एकदा सत्ता देऊन बघा’, असं म्हणत राज्यभर प्रचारसभा घेऊन राजकीय प्रबोधन करणाऱ्या राजसाहेब ठाकरे यांच्या पदरी यावेळीही निराशाचा पडली असल्याने मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यामध्ये कमालीची अस्वस्थता आणि प्रचंड राग निर्माण झाला आहे, दरम्यान प्रचारसभांमध्ये तासंतास बोलणाऱ्या राजसाहेब ठाकरें यांनी पराभवावर मात्र “अविश्वसनीय” अशा शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे जी या विधानसभा निवडणूकीच्या एकूण अचंभीत करणाऱ्या भाजपच्या रणणितीवर आक्षेप घेणारी आहे. जर मनसेच्या 15, 20 विधानसभेत जागा निवडून आल्या तरी या महाराष्ट्रात हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून पुन्हा हिंदुत्वाची तोफ धडाडेल व भाजपला पुन्हा त्यांच्या दारीं उभं राहावे लागेल ते होऊ नये अर्थात दुसरे बाळासाहेब निर्माण होऊ नये यासाठी भाजप ने कट रचून मनसेच्या उमेदवाराला हरवलं असल्याची भावना महाराष्ट्र सैनिकांकडून व्यक्त होतं आहे.
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी स्वार्थी आणि ढोंगीपणाचं कधीही राजकारणं केलं नाही, जे खरं आहे ते जनतेसमोर मांडण्याची हिंमत आणि कौशल्य असणाऱ्या राजसाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेला टिकविण्यासाठी नेहमीच प्रयत्न केलेत, या राज्यात मराठी तरुणांना रोजगार मिळावा म्हणून परप्रांतीयांना या राज्यातील उददोगामधून हाकलून लावण्यासाठी आंदोलन करणारे, केंद्र शासनाच्या रेल्वे भरतीत आमच्या मराठी तरुणांना नोकरी मिळावी म्हणून तीव्र आंदोलन करणारे राजसाहेब ठाकरे यांच्यावर शंभर पेक्षा जास्त पोलीस केसेस आहेत, पण तरीही मोठ्या उदार मनाने मराठी माणूस एकदा तरी माझ्या हातात सत्ता देईल या भोळ्या आशेपोटी ते नेहमी मराठी माणसाला साद घालत होते, पण या विधानसभा निवडणुकीत शेवटी त्यांच्या पदरी निराशाचं लागली असल्याने त्यांच्या मनात अनेक प्रश्नांचे काहूर माजले असावेत म्हणून त्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया देतांना ट्वीट करत म्हटलं की “अविश्वसनीय! तूर्तास एवढंच….” यावरून हा पराभव झाला नाही तर हा पराभव कट रचून केला गेला आहे हे त्यांना म्हणायचं आहे असं स्पष्ट दिसत आहे.
भाजपची कुटनीती काय?
भाजप हा असा पक्ष आहे जो स्वतःच्या स्वार्थासाठी कुणाच्याही सोबत जाणारा आणि स्वार्थ संपला की त्यालाच संपविणारा आहे, अर्थात शिवसेनेच्या सोबत राहून भाजप वाढली आणि शेवटी शिवसेनेला संपवण्याचं छडयंत्र रचलं, लोकसभा निवडणुकीत आपण महाराष्ट्रात हरणार अशी परिस्थिती दिसत असल्याने मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या शिवतीर्थावर उंबरठे झिजविणारे भाजप नेते यांनी समर्थन मागितलं आणि मोबदल्यात काही देऊ केलं, पण उदार अंतकरणानी राजसाहेब ठाकरे यांनी स्वतःचा स्वार्थ न बघता बिनशर्त पाठिंबा देऊन भाजप उमेदवा्रांसाठी जाहीर सभा घेतल्या आणि जिथे सभा झाल्या तिथे भाजपचे उमेदवार निवडून आले, पण जिथे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीचा विषय आला तेंव्हा मात्र याचं भाजपच्या नेत्यांनी बाकी उमेदवार तर सोडाच राजसाहेब ठाकरे यांच्या मुलाला वरकरणी पाठिंबा देण्याचं ढोंग केलं पण आतमधून गेम केला आणि मनसेच्या उमेदवाराला निवडून येऊ द्यायचं नाही असं प्लान करून निवडून येणारे उमेदवार पाडले ही परिस्थिती आहे, कारण मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना त्यांच्याच कर्मभूमीत राजसाहेब ठाकरे आणि मनसेचं वलंय असतांना पाडणं पाहिजे तेवढं सोपं नव्हतं पण कट रचून पाडल्या गेलं ही वस्तुस्थिती आहे, त्यासाठी भाजप ची सायबर टीम कामाला लागली असावी आणि हा दिल्लीचा गेम आहे हे आता स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे यापुढे राजसाहेब ठाकरे यांनी भाजपला कुठल्याही परिस्थितीत सहकार्य आणि समर्थन करू नये, हे विश्वासघातकी आहे आणि यांची कूटनीती व परंपरा सुद्धा हिचं राहिली आहे हे समजून घेणं आता फार गरजेचं आहे.
मनसेचे हे उमेदवार निवडून येऊ शकत होते.
महाराष्ट्रात मनसेचे कोण कोण आमदार निवडून येईल याबद्दल सामाजिक माध्यमावर चर्चा सुरु असतांना अनेक टीव्ही न्यूज चैनल द्वारे सुद्धा मनसेच्या सम्भावीत आमदाराविषयी चर्चा होती की माहीम मधील मनसेचे अमित ठाकरे, शिवडी मधील मनसे नेते बाळा नांदगावकर, परळी मधील संदीप देशपांडे, नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे, ठाणे मधील अविनाश जाधव, पुणे खडकवासला मधील मयुरेश वांजळे, पुणे मधील किशोर शिंदे इत्यादी किमान आमदार निवडून येऊ शकत होते व अमित ठाकरे बाळा नांदगावकर मयुरेश वांजळे गजानन काळे हे उमेदवार पडूच शकत नव्हते आणि बाकी अनेक ठिकाणी चुरशीच्या लढतीत मनसेचे उमेदवार होते परंतु मनसेचे उमेदवार निवडून आले तर राज्यात पुन्हा बाळासाहेबांच्या शिवसेनेतील तत्कालीन वादळ पुन्हा राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात थैमान घालेल त्यामुळे आपलं स्वार्थी हिंदुत्व धोक्यात येईल या एका धसक्याने भाजप ने डाव रचला व कट रचून मनसेच्या उमेदवाराला पाडलं ते कसं पाडलं हे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला दिसलं आहे, कारण त्यांनी केवळ मनसे उमेदवारालाच पाडलं नाही तर आपले विरोधक सुद्धा संपविण्याचा डाव साधला आहे हे राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे तरंच त्यांचा हा डाव येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उधळून लावता येईल.