Home चंद्रपूर भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गांधी चौक येथे स्क्रीनवर होणार...

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गांधी चौक येथे स्क्रीनवर होणार शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण.

भारतीय जनता पार्टी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गांधी चौक येथे स्क्रीनवर होणार शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण.

लाडू वाटप करून होणार जल्लोष

राजेंद्र मेश्राम 

विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर:-भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित आमदार किशोर जोरगेवार यांच्या सौजन्याने भारतीय जनता पक्ष, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने गांधी चौक येथील महापालिकेच्या पटांगणावर एलईडी स्क्रीनवर शपथविधी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. तसेच यावेळी लाडू वाटप करून जल्लोष साजरा केला जाणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. मुंबई येथील आझाद मैदानावर उद्या ते गोपनीयतेची शपथ घेतील, असे चित्र आहे. या शपथविधी कार्यक्रमासाठी चंद्रपूरातही तयारी सुरू करण्यात आली असून शहरातील गांधी चौक येथे एलईडी स्क्रीनवर सदर शपथविधी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात येणार आहे.
यावेळी भारतीय जनता पक्ष आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार असून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच लाडू वाटप करून भाजप कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जाणार आहे. संध्याकाळी ४ वाजतापासून सदर कार्यक्रमाला सुरुवात होणार असून नागरिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here