Home चंद्रपूर एल्गार :- चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंक नोकर भरतीमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे.

एल्गार :- चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंक नोकर भरतीमध्ये आरक्षण मिळालेच पाहिजे.

स्थानिक विश्रामगृहातील आरक्षण बचाव संघर्ष कृती समीतीच्या बैठकीत एल्गार, 2 जानेवारीपासून आंदोलनास सुरुवात.

चंद्रपूर :-

चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेत 360 पदाच्या नोकर भरतीत मागासवर्गीयांचं आरक्षण संपवून खुल्या प्रवर्गात भरती घेणाऱ्या बैंक अध्यक्ष संतोष रावत व इतर संचालकांनी प्रत्येक उमेदवार यांच्याकडून 25 ते 35 लाख रुपये नोकरीसाठी घेऊन त्यांना आयटीआय कंपनीच्या माध्यमातून परीक्षेत पास करण्याची व्यवस्था केल्याने ही नोकर भरतीची परीक्षा बोगस पद्धतीने होतं असल्याचे परीक्षा केंद्रात झालेल्या गोंधळामुळे स्पष्ट दिसत आहे, दरम्यान परीक्षेच्या पहिल्याच दिवशी ऑनलाईन परीक्षेत घोळ झाल्याने ती परीक्षा रद्द करण्यात आली, दरम्यान 29 डिसेंबरला सुद्धा दुसऱ्यांदा घेण्यात आलेली परीक्षा सुद्धा विवादात सापडली असल्याने सिडीसीसी बैंक नोकर भरती पूर्णतः मैनेज करून घेतली जात आहे त्यामुळे ही नोकर भरती थांबवा व नव्याने मागासवर्गीयांचे आरक्षण ठेऊन नोकर भरती घ्या या मागणी करिता जिल्ह्यातील एससी, एसटी व ओबीसी प्रवर्गातील सर्व जातीच्या प्रतिनिधीची स्थानिक विश्रामगृहात दिनांक 30/12/2024 ला सायंकाळी 4.00 च्या दरम्यान एक बैठक बोलविण्यात आली होती,

या बैठकीत कुणबी एकता मंच चे अध्यक्ष इंजि दिलीप झाडे, राष्ट्रीय तेली समाज संघटनेचे राजेंश बेले, भोई समाज संघटनेचे बंडू हजारें, पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, पीपल्स पार्टी ऑफ इंडिया चे चंद्रपूर अध्यक्ष महेंद्र खंडाळे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा नभा वाघमारे, आदिवासीचे नेते रमेश मेश्राम, स्वराज्य शेतकरी संघटनेचे (महाराष्ट्र राज्य) संस्थापक सूर्या अडबाले, धनगर समाज संघटनेचे संजय कन्नावार, झाडे सुतार समाज संघटनेचे अध्यक्ष मंगेश बुरडकर, महाराष्ट्र नव्हिक संघांचे जिल्हाध्यक्ष दिनेश एकवनकर, ओबीसी सेवा संघाचे सरचिटणीस राजू कुकडे, माळी समाज संघटनेचे सचिन निंबाळकर, अहिर समाज संघांचे अनुप यादव इत्यादीची उपस्थिती होती,

कुठल्याही स्थितीत जिल्ह्याच्या हक्काच्या बैंकेत आरक्षण हे लागू झालच पाहिजे या मागणीसाठी उद्या दिनांक 31 डिसेंबरला जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन जो पर्यंत माlगासावर्गीय समाजाच्या (एससी, एसटी व ओबीसी समाजाच्या) बिंदू नामावली अनुसार आरक्षण देऊन नोकर भरती होतं नाही तोपर्यंत आम्ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक समोर दिनांक 2 जानेवारी 2025 पासून ठिय्या आंदोलन करू असा निर्णय सदर बैठकीत घेण्यात आला असून जिल्ह्यातील सर्व मागासवर्गीय जातीनिहाय समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here