Home चंद्रपूर दखल :- स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पुन्हा क्रिकेट ऑनलाईन जुगार घेणाऱ्याला केली...

दखल :- स्थानिक गुन्हे शाखा पथकाने पुन्हा क्रिकेट ऑनलाईन जुगार घेणाऱ्याला केली अटक.

येणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा ऍक्शनमोडवर? सर्व क्रिकेट सट्टाकिंग रडारवर.

चंद्रपूर :-

क्रिकेट सामन्याच्या जय पराजयावर सट्टा लावणारी संयुक्त टोळी काम करत असून देशपातळीवर याचे जाळे पसरले आहें, दरम्यान नागपूरनंतर सर्वात जास्त क्रिकेट सट्टा हा चंद्रपुरात खेळला व लावला जातो त्यामुळे पोलीस प्रशासनाची याकडे तिरची नजर असतें, यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेने एक मोहीम राबवली असून काही दिवसांपूर्वी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात व्यंकटेश हॉटेलमध्ये क्रिकेट बेटिंग घेताना तिघांना अटक करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा येणाऱ्या आयपीएल क्रिकेट सामन्याच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखा ऍक्शनमोडवर आली असून म्हातारदेवी घुग्गुस मध्ये राहणारा २६ वर्षीय युवक अंशुल रामबाबू रॉय ला १६ मार्च रोजी लिजेंड लीग मध्ये खेळल्या गेलेल्या भारत-वेस्टइंडीज च्या अंतिम सामन्यात क्रिकेट बेटिंग घेताना अटक केली आहें l.

क्रिकेट जगतात चॅम्पियन्स ट्रॉफी नंतर लिजेंड लीग क्रिकेट सामन्यांना सुरुवात झाली होती, यावर क्रिकेट बेटिंग मोठ्या प्रमाणात सुरु झाली. चंद्रपूर शहरात क्रिकेट सट्टेबाज यांच्यावर कारवाई झाल्यावर पोलिसांच्या नजरा या सट्टेबाजांवर होत्या, दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेला क्रिकेट बेटिंगबाबत गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीच्या आधारे एलसीबी पथक घुग्गुस मधील म्हातारदेवी या गावात धडकले आणि अंशुल रामबाबू रॉय ला अटक केली, आरोपीच्या kingexch९.com या आयडीमध्ये ३८ लाख रुपयांचे डिजिटल कॉइन सोबतच १ मोबाईल व रोख ३ लाख रुपये असा एकूण ४२ लक्ष रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला व आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here