Home चंद्रपूर दुदैवी :- एसटीची रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला धडक, वाहकाचा मृत्यू तर 13...

दुदैवी :- एसटीची रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला धडक, वाहकाचा मृत्यू तर 13 गंभीर.

RTO च्या एंट्री फी च्या नावाखाली ट्रान्सपोर्ट कंपन्यांना दिलेली खुली सूट जीवावर बेतली. चड्डा ट्रान्सपोर्टच्या संचालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.

पडोली :-

चंद्रपूर नागपूर हायवे रस्त्यावर नेहमीच पडोली ताडाळी परिसरात ट्रान्सपोर्ट कंपन्याच्या वाहनांच्या रांगाच रांगा बघायला मिळतात त्यातच सीएसटीपीएस मधून निघणारी राख आणि कोळसा वाहतूक यामधून मोठे प्रदूषण होत असून कधी कधी रस्त्यावर राख अक्षरशः राख पडून असल्याने त्यावरून जाणारे ट्रक वाहन यांच्यामुळे हवेत धूर उडून समोरील रस्ताच दिसत नसल्याने अपघात होत असतात असाच काल रात्री चड्डा ट्रान्सपोर्ट च्या ट्रक ला राज्य परिवहन मंडळाच्या बसची टक्कर लागल्याने वाहकाचा जागीच मृत्यू झाला आहें तर जवळपास 13 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहें, या संदर्भात एसटी चालकास विचारणा केली असता राखेची एवढी धूर हवेत होती की समोर उभा असलेला ट्रक दिसला नाही आणि त्यामुळे टक्कर झाली असल्याचे त्याने सांगितले. मात्र या घटनेला RTO अधिकारी व पोलीस जबाबदार असून त्यांच्याकडे याबाबत तक्रार दिल्यानंतर सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही त्यामुळे एकाचा बळी गेला असल्याने चड्डा ट्रान्सपोर्टच्या संचालक यांच्यासह RTO अधिकाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहें.

मिळालेल्या माहितीनुसार १५ मार्च रोजी मध्यरात्री हायटेक कॉलेज ऑफ फार्मसी समोर नागपूर वरून चंद्रपूरकडे येणाऱ्या बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रक ला धडक दिली, या धडकेत बस मधील वाहक ठार झाला तर १३ जण गंभीर जखमी झाले. राज्य परिवहन विभागाची बस क्रमांक MH14 KA 8587 नागपूरवरून चंद्रपूरच्या दिशेने येत होती. यावेळी रस्त्यावर उभा असलेला चड्डा कंपनीचा ट्रक क्रमांक MH31 CA 3171 ला बसने जोरात धडक दिली. धडक इतकी जोरदार होती कि बस चा समोरील भाग चक्कनाचूर झाला. दरम्यान मध्यरात्री अपघात झाला अशी माहिती पोलीस व राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली, त्यांनतर घटनास्थळी पोलीस व राज्य परिवहन विभागाचे अधिकारी दाखल झाले, प्रवाशांना पोलीस व नागरिकांच्या मदतीने बसमधून बाहेर काढत रुग्णवाहिकेत बसवीण्यात आले. बसचे चालक दत्तात्रय इंगोले यांना नागरिकांनी बाहेर काढले. बसचे वाहक संदीप वनकर ट्रक व बसच्या सीट्मध्ये फसून गेले होते. त्यांच्या मागे बसलेले एसटी महामंडळाचे कर्मचारी सिद्धार्थ मडामे या दोघांना बसचा पत्रा कापून बाहेर काढत होते.वाहक संदीप वनकर यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

खरं तर रस्त्यावर ट्रक उभा ठेवल्यास त्याला झाडाची फांदी, रेडियम लावण्याचा नियम आहे, मात्र आपण RTO ला एंट्री फी देतो त्यामुळे ते आपणावर कारवाई करू शकत नाही या मस्तीत असलेल्या ट्रान्सपोर्ट कंपन्याचे ट्रक चालक आपलं कुणीही काही बिघडवू शकत नाही या तोऱ्यात वाहन कुठेही ठेवतात त्यामुळे अशा दुर्दैवी अपघातात माणसे मेली जातात, दरम्यान एसटी महामंडळाने याबाबत पडोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देत चड्डा ट्रान्स्पोर्टचे चालक राजन बनवारी यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here