CDCC बैंकेचे संचालक व चेले चपाटे म्हणतात की मुख्यमंत्र्यांना पण सेट केलंय? काय असेल मुख्यमंत्र्यांची भूमिका?
लक्षवेधी :-
राजकारणं हा बदमाशांचा शेवटचा अड्डा आहे असं म्हटल्या जातं, कारण जिथे सगळ्यां बदमाशा केल्यानंतर त्या बदमाशा अंगलट येतात तेंव्हा त्यांना सत्तेच्या राजकारण्यापुढे शरण जावं लागतं, तसाच काहीचा प्रकार सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत सुरु असून या बैंकेच्या 360 पदांच्या नोकर भरतीत 100 कोटींपेक्षा जास्तीचा घोटाळा येथील अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व सिईओ यांच्या माध्यमातून झाल्यानंतर या सर्वांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून त्यांना इथे लक्ष घालू नये अशी अर्थपूर्ण विनंती केल्याची व मुख्यमंत्र्यांना पण सेट केलंय? अशी चर्चा दस्तूरखुद्द काही संचालक व त्यांचे चाटू चमचे व चेले चपाटे करत आहे, अशातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरती घोटाळ्याची एसआयटी द्वारे चौकशी नक्कीच होणार कां? हा प्रश्न जनतेच्या रडारवर आहे, कारण बैंकेच्या नोकर भरती दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काकू आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांच्याशी सिडिसीसी बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांची झालेली चर्चा आणि त्यामुळेच सत्ताधारी राजकीय वरदस्त आपल्या पाठीशी आहे हे दाखवून देण्यासाठी सिडीसीसी बैंकेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करणारे मोठे होर्डिंग शहरात लावण्यात आले, त्यामुळे सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीचा घोटाळा उघड होणार का? याबद्दल शंका निर्माण होतं आहे.
सीडीडीसी बैंकेच्या नोकर भरतीत कोट्यावधीचा घोटाळा झाला आणि त्यासाठी बैंकेच्या भ्रष्ट व्यवस्थेने आयटीया ह्या परीक्षा घेणाऱ्या कंपनीला हाताशी धरून गोरगरीब स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या ओबीसी एससी एसटी प्रवर्गाच्या हुशार विद्यार्थ्यांना डावललं यामुळे आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे समन्वयक राजू कुकडे यांच्या नेतृत्वात मनोज पोतराजे, रमेश काळाबाँधे, संजय कन्नावार, सूर्या अडबाले, नभा वाघमारे, अनुप यादव, राजू बिट्टूरवार, बंडू हजारें, महेश वासलवार, आंनद इंगळॆ, महेंद्र खंडाळे, मिलिंद खोब्रागडे, नितीन उदार, दिलीप झाडे, सुनील गुढे व इतर सामाजिक संघटनाच्या सहभागाने ठिय्या आंदोलन व आमरण उपोषण करण्यात आले, दरम्यान या आंदोलनाला राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाठिंबा देत मागासवर्गीय एससी, एसटी, ओबीसी व महिलांचे आरक्षण नाकारणाऱ्या सिडिसिडी बैंकेच्या या नोकर भरतीला स्थगिती मिळावी म्हणून त्यांनी आंदोलन मंडपातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भ्रमणध्वनी वरून संपर्क करून आंदोलनकर्त्याला भेट द्यावी अशी विनंती केली, दरम्यान मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात 27 जानेवारीला आंदोलनकर्त्यांचे शिष्ठमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटले आणि एसआयटी चौकशीची मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली त्यावर मुख्यमंत्र्यांनी निश्चितपणे चौकशी होईल अशी ग्वाही दिली, एवढेच नव्हे तर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलनकर्ते मनोज पोतराजे यांना भ्रमणध्वनीवरून संवाद साधत आपण आमरण उपोषण मागे घ्या आपण बैंकेच्या सर्व अनियमितता आणि अनागोंदी कारभार याची चौकशी करून कारवाई करू अशी ग्वाही दिली होती आणि त्यामुळेच आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
डीडीआर च्या चौकशीला बैंक सिईओ कल्याणकरची दांडी?
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीच्या चौकशीचे आदेश सहकार आयुक्त यांना दिल्यानंतर विभागीय सहनिबंधक यांनी सात दिवसात सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीच्या घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधक सारडा यांना आदेश दिले, दरम्यान जिल्हा उपनिबंधक सारडा यांनी सिडीसीसी बैंकेला स्वतः पत्र देऊन चौकशी करिता आवश्यक दास्तावेज उपलब्ध करण्याचे फर्मान सोडले आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयात हजर राहण्याचे पत्र दिले परंतु मागील दहा दिवसापासून बैंकेचे सिईओ राजेश्वर कल्याणकर स्वतः तर चौकशीला दांडी मारत आहेत शिवाय बैंकच्या इतर अधिकाऱ्यांना पण हजर राहण्याचे अधिकार त्यांनी दिले नाही, यावरून चौकशीला सामोरे जाण्याची हिंमत त्यांच्याकडे नाही किंव्हा त्यांना केवळ वेळ मारुन न्यायची आहे असे दिसतं आहे,
सिडीसीसी बैंकेत असाच झाला होता भरती घोटाळा, संचालकांवर गुन्हे दाखल.
सन 2013 मध्ये 24 चपरासी आणि लिपिक पदाच्या भर्तीची जाहिरात प्रसिद्ध झाली होती. ज्यामध्ये कित्तेक बेरोजगार युवकांनी फार्म भरले होते, त्यावेळी एमकेसीएल या कंपनी कडे नोकर भरतीची परीक्षा प्रक्रिया करण्याचे काम होते, मात्र दरम्यान काही मुलांचे मार्क्स वाढवून त्यांना पास करण्यात आले आणि त्यावेळी लाखों रुपये त्या उमेदवारांकडून घेण्यात आल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत निष्पन्न झाल्यानंतर बैंकेचे तत्कालीन अध्यक्ष शेखर धोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय खेड़ीकर, संचालक रवींद्र शिंदे, नंदा अल्लूरवार, पांडुरंग जाधव, ललित मोटघरे, प्रभा वासाड़े, लक्ष्मी पाटिल, अशोक वाहणे, व निवड समितीचे 3 अधिकारी, एमकेसीएल चे प्रतिनिधि यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, महत्वाची बाब म्हणजे त्यापैकी सर्वच संचालक या नोकर भरतीत सक्रिय असल्याने पुन्हा बैंकेचे अध्यक्ष संतोष रावत सह इतर संचालकावर गुन्हे दाखल होतील कां हे पाहणे औस्तुक्याचे असणार आहे.
मुख्यमंत्र्याच्या तिसऱ्यांदा चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्याची काय विशेषतः?
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच देवेंद्र फडणवीस he राज्याचे द्वितीय मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांच्या जयंती निमित्य चंद्रपूर दौऱ्यावर आले होते तेंव्हा सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरती घोटाळ्याविरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे आंदोलन सुरु होते, त्यावेळी ते उपोषण आंदोलन मंडपाला भेट देतील अशी चर्चा होती, मात्र त्या कार्यक्रमाचे तथाकथित आयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी कदाचित त्यांच्या कार्यक्रम वेळात अशी तरतूद केली नव्हती असे कळाले, त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यात आनंदवन इथे कुष्ठारोगी सेवा समितीच्या कार्यक्रमाला आले आणि आता ते प्रियंदर्शनी सभागृहात त्यांच्या काकू माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला येत आहे, खरं तर चंद्रपूर जिल्हा हा देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा आहे त्यामुळे त्यांना चंद्रपूर जिल्ह्याप्रती विषेश प्रेम असावं याबद्दल दुम्मत नाही, पण सिडिसीसी बैकेत कांग्रेसची सत्ता प्रदीर्घ काळापासून असतांना व आता त्या बैकेत कोट्यावधीचा घोटाळा झाला असताना त्यांनी खरं तर पुढाकार घेऊन स्वतःच्या पक्षाची सत्ता बैकेत निर्माण व्हावी यासाठी या बैंकेची खरोखर एसआयटी चौकशी जलद गतीने करायला हवी, कारण उच्चं न्यायालयात बैंकेच्या संचालकांची निवडणूक घेण्याबाबत आदेश झाला आहे, अगदी पाच महिन्यात ही निवडणूक होणार आहे, त्यामुळे जर ही चौकशी जलद गतीने झाली आणि सहकार कायाद्यात केलेल्या सुधारणाचे आयुध वापरल्यास किमान 8 संचालक पुढील निवडणूक लढण्यास अपात्र ठरतील अशी स्थिती आहे आणि जर हे संचालक अपात्र ठरले तर भाजप च्या हातात बैंकेची सूत्रे येऊ शकतात, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सिडीसीसी बैंकेच्या संदर्भात नेमकी काय भूमिका असेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.