Home चंद्रपूर धक्कादायक:- सिडीसीसी बैंकेच्या सिईओ कल्याणकर यांच्यामुळे चेअरमॅन ची आत्महत्त्या?

धक्कादायक:- सिडीसीसी बैंकेच्या सिईओ कल्याणकर यांच्यामुळे चेअरमॅन ची आत्महत्त्या?

फसवणूक धोखाधडी सारखे गंभीर गुन्हे दाखल असतांना सिडीसीसी मध्ये सिईओ पदावर कल्याणकर कसे?

चंद्रपूर :-

सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीची जबाबदारी ज्या सिईओ राजेश्वर कल्याणकर यांच्यावर होती व त्या नोकर भरतीत कोट्यावधी रुपायचा घोटाळा झाल्याची वार्ता सगळीकडे घोंगवत असतांना औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बैकेत ते कार्यरत असताना त्यांचेवर कलम 156(3),  420, 465, 467, 468, 471, 406, 409, 34, 120 B अन्वये फौजदारी गुन्हे दाखल आहे तर दुसऱ्यांदा पुन्हा कलम 406, 409, 420, 463, 468, 471, 120B अन्वये गुन्हे दाखल आहेत आणि नांदेड जिल्हा बैंकेचे कार्यकारी संचालक व प्राधिकृत अधिकारी यांनी 2 कोटीचे सामान रात्री यंत्र सामुग्री चोरी केल्याबद्दल सुद्धा सिईओ कल्याणकर यांच्या विरोधात पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल आहे. दरम्यान राजेश्वर कल्याणकर यांच्यावर औरंगाबाद आणि नांदेड जिल्हा बैकेत अनेक घोटाळे केल्याचा आरोप असतांना व अमरावती येथील बैंकेच्या कर्मचारी यांनी भ्रष्टाचार व कुटील डाव खेळत असल्याने कल्याणकर यांना मारहान केली असल्याची माहिती असतांना त्यांना सिडीसीसी बैंकेचे सिईओ पदावर कुणी बसवले आणि त्यामागे काय कारण होतं याबद्दल सिडीसीसी बैंकेचे माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांनी सुद्धा रामनगर पोलीस स्टेशनं मध्ये तक्रार दाखल केली आहे पण तरीही त्यांना सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीची प्रमुख जबाबदारी दिली असल्याने सर्वांना आश्चर्य वाटतं आहे, मात्र यापेक्षा धक्कादायक म्हणजे औरंगाबाद मध्यवर्ती सहकारी बैंकेचे जेव्हा चेअरमन व संचालक मंडळावर अपहार, भ्रष्टाचार गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली तेव्हा चेअरमन सुरेश दयाराम पाटील यांनी आत्महत्या केली होती व त्यात राजेश्वर कल्याणकर यांच्यामुळे त्यांना आत्महत्त्या करावी लागली असल्याची तक्रार आर. एल तुपे यांनी केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीत आरक्षण डावलून व परीक्षार्थी कडून लाखों रुपये घेऊन नोकर भरती केल्याची चर्चा आहे, सिडीसीसी बैंकेच्या या भ्रष्ट मार्गाने होणाऱ्या नोकर भरती विरोधात आरक्षण बचाव संघर्ष कृती समितीचे समन्वयक राजू कुकडे यांच्या नेतृत्वात सुरुवातील ठिय्या आंदोलन आणि नंतर मनोज पोतराजे आणि रमेश काळाबांधे यांच्या माध्यमातून आमरण उपोषण करून शासन प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते, दरम्यान राज्याचे माजी अर्थमंत्री आणि विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने आंदोलनकर्ते यांची मुंबई येथे सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली आणि बैंकेच्या नोकर भरतीची एसआयटी द्वारे चौकशी करून कार्यवाही करण्याची ग्वाही देण्यात आली, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शब्दामूळे आंदोलन मागे घेण्यात आले, मात्र विभागीय सहनिबंधक यांनी स्थानिक जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे चौकशी करण्याचे पत्र देऊन 7 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले, परंतु सिडीसीसी बैंकेचे सिईओ राजेश्वर कल्याणकर हे चौकशी करिता उपस्थित राहत नसून पाच दिवसापासून त्यांनी जिल्हा उपनिबंधक यांनी मागितलेले काहीही दास्तावेज सादर केले नाही, दरम्यान ते ज्या उमेदवारांना पैसे घेऊन भरती केले त्यांच्याकडून उर्वरित रक्कम गोळा करण्यासाठी चंद्रपूर वगळता इतर जिल्ह्यातील उमेदवारांकडून पैसे वसुली करित असल्याची चर्चा आहे.

सिडीसीसी अध्यक्षाला तुपेचे पत्र, सिईओ पदावर कल्याणकर ला ठेऊ नका.

सिडीसीसी बैंक सिईओ राजेश्वर भिमराव कल्याणकर याच्याबाबत तक्रारकर्ते आर. एल तुपे यांनी सिडीसीसी बैंकेच्या अध्यक्ष यांना सुद्धा पत्र लिहून पुराव्यासह माहिती दिली की राजेश्वर भिमराव कल्याणकर यांनी नांदेड डि.सी.सी. बैंकेत अपहार, घोटाळे केलेल आहेत. तसेच तो अमरावती डि.सी.सी. बँकेत त्यांनी चेअरमन व संचालक, संचालक मंडळ व कर्मचाऱ्यांत भांडणे लावण्याचे काम केलेले होते. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी त्याला मारहाण करुन तेथून हाकलून दिले. राजेश्वर भिमराव कल्याणकर हा औरंगाबाद जि.म.सह. बँकेत सन २०१२ मध्ये रुजू झाला. येथे त्यांनी अपहार, घोटाळे करण्यास चेअरमनला मदत केली. जेव्हा चेअरमन व संचालक मंडळावर अपहार, भ्रष्टाचार गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली तेव्हा चेअरमन सुरेश दयाराम पाटील यांनी आत्महत्या केली. सुरेश दयाराम पा. हे बँकेत जवळजवळ संचालक पदापासून ते चेअरमन मर्यंत ४० ते ४५ वर्षे बँकेचे संचालक चेअरमन म्हणून काम बघितले. शेवटी या राजेश्वर भिमराव कल्याणकर मुळे त्यांना आत्महत्या करावी लागली. हा राजेश्वर भिमराव कल्याणकर त्याचे गुपित असलेल्या काही गोष्टी हा रेकॉर्डिग करुन राजकीय दुश्मन असलेल्या व्यक्तीला सांगत असे. हळुहळु ब्लैकमेलचे काम करतो. सुरेश दयाराम पा. यांच्या नातेवाईकाने तो रेकॉर्डिंग करीत असताना त्याला रंगेहाथ पकडले व त्याला तेथे मारहाण केली. नंतर त्याचा राजीनामा घेतला. कल्याणकर हा कर्मचाऱ्यांकडून लाचही घेत असे. संचालक मंडळ चेअरमन यांच्यात वाद निर्माण करित असे. याचे असे अनेक लफडे आहे असेही पत्रात नमूद आहे. पण तरीही बैंकेच्या नोकर भरतीत असेच लफडेबाज कल्याणकर यांना त्याचा अनुभव पाहता सिडीसीसी बैंकेच्या अध्यक्ष संतोष रावत यांनी त्यांना सिईओ पदावर घेतले असल्याची गंभीर बाब समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here