मृत गाडी मालकाला जिवंत दाखवुन गाडीची रजिस्ट्री, रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार पण RTO अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल नाही?
RTO चा पंचनामा भाग -10
प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर पदभार सांभाळणारे किरण मोरे आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचे सूत्र सांभाळणारे आनंद मेश्राम यांच्या भ्रष्ट कारणाम्याच्या चितरकथा सध्या जोरात सुरु आहें, भ्रष्टाचाराच्या गुहेत लपून “कडी लावा आतली आणि मी नाही त्यातली.” या भूमिकेत कोट्यावधी चा भ्रष्टाचार करणारे पण ते आम्ही नव्हेच या तोऱ्यात वावरणारे RTO अधिकारी मोरे व मेश्राम यांना खरं तर राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भ्रष्टाचारचं मेडल देऊन सत्कार करायला हवा, एवढी मोठी कामगिरी ते सध्या बजावत आहें, अगदी एक कनिष्ठ कर्मचारी काम करून देण्याच्या नावाखाली चिरीमिरी घेतो त्यापेक्षा खालच्या स्थराला जाऊन हे दोन अधिकारी आपल्या अधीनस्त अधिकारी कर्मचारी आणि खाजगी ठेवलेल्या एजंट मार्फत लाच घेऊन पैसा गोळा करतात ही अतिशय चिंताजनक बाब असून या अधिकाऱ्यावर पोलीस प्रशासन मात्र मेहरबान असल्याने यांची ही भ्रष्ट रणणिती कायम सुरु आहें, खरं तर चंद्रपूर तेलंगना सिमा नाक्यावर RTO सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते यांना 500 रुपयाची लाच घेतांना एसीबी च्या अमरावती टीम ने रंगेहात पकडल्या नंतर सुद्धा आजही त्या सिमा नाक्यावर एंट्री फी च्या नावावर पैसे घेण्याचा यांचा उपक्रम थांबला नाही एवढे हे मुजोर झाले आहें, यामागे कारण तपासले गेले तर RTO मोरे व मेश्राम यांनी एसीबी च्या अमरावती टीम ला पैसे देऊन परस्पर हे प्रकरण दडपलं असल्याची चर्चा आहें.
एकीकडे RTO च्या तेलंगना सिमा नाक्यावर दररोज लाखोंची एंट्री फी च्या नावावर आजही वसुली सुरु असतांना याचं RTO अधिकारी मोरे व मेश्राम यांच्या आशीर्वादाने मृत गाडी मालकाला जिवंत दाखवून त्या गाडी ची रजिस्ट्री करण्यात आल्याचा सनसनीखेज प्रकार समोर आला आहें, या संदर्भात रामनगर पोलीस स्टेशनं येथे तक्रार झाली मात्र पोलीस प्रशासनाला देऊन घेऊन एवढी मोठी बाब दडपण्यात आली असून अजूनही पोलीस कुठला तपास करत आहें हे मात्र कळायला मार्ग नाही, दरम्यान आपल्या RTO कार्यालयात सगळं ऑनलाईन काम झाल्याने भ्रष्टाचार होतं नाही हे तोंड वर करून सांगणारे RTO अधिकारी मोरे व मेश्राम यांच्या माध्यमातून हे प्रकरण दडपल्या जातं असल्याची माहिती समोर येत आहें.
काय आहें हे गाडीचं प्रकरण?
टाटा कंपनीची होनान (एम.एच. ३४ एबी. ६८०३ बी) या गाडीची माहीती अधिकारात एका व्यक्तींनी माहीती मागीतली होती. त्या गाडीचे मालक किसन नानाजी कुभारे रा. शिव मंदीर वार्ड बायपास रोड चंद्रपुर यांचे नावाने असुन तो इसम सन २०२१ मध्ये लॉकडाउन मध्ये मरण पावला होता. दरम्यान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय चंद्रपुर येथील माहितीनुसार सदर इसम हा सन २०२१ मध्ये मरण पावल्यानंतर सुद्धा सन २०२२ मध्ये मृतक किसन कुभारे रा. चंद्रपुर यास जिवंत दाखवुन त्याचे गाडीची रजिस्ट्री करून दिली असल्याचे त्या रजिस्ट्री वरुन समोर आले, मात्र यामध्ये RTO चे अधिकारी व कर्मचारी आणि त्यांचे खाजगी एजंट सोबत साठगाठ असल्याने मृतक किसन कुभारे यास जिवंत दाखवुन एम.एच. ३४ एबी. ६८०३ ची रजिस्ट्री एकनाच सुरेश एकोणवार रा. चेक दरूर यांना करून दिली आहे. या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन येथिल अधिकारी व कर्मचारी यांनी मिळुन गाडी क. एम.एच. ३४ एवी. ६८०३ या गाडीची बोगस रजिस्ट्री करून दिल्या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशन येथे एका व्यक्तीने लेखी तक्रार पुराव्यासह केलेली होती. परंतु पोलीस स्टेशन रामनगर येथील तत्कालीन पोलीस अधिकारी धोबे याचेकडे मृतक यांचे मृत्यु प्रमाणपत्र दिलेले असुन सुध्दा त्यांनी सदर तकार अर्जाची चौकशी न करता व त्यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व एजंट यांचेवर कोणतीही कार्यवाही केलेली नाही शिवाय तत्कालीन पोलीस निरीक्षक मुळे यांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेकडुन आर्थिक लाभ घेऊन त्यांना पाठीशी घातले असल्याचा आरोप होत आहे,
सर्वसामान्य कार्यकर्त्यावर पोलीस गुन्हे दखल करतात मग मोरे आणि मेश्राम वर का नाही?
RTO अधिकारी किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्या विरोधात वरिष्ठाकडे किंव्हा एसीबी कडे तक्रार करणाऱ्या सामाजिक राजकीय कार्यकर्त्याविरोधात खंडणी मागताहेत म्ह्णून पोलिसांच्या माध्यमातून खोट्या गुन्ह्यात फसविल्या जाते तर मग स्वतः ज्यांच्या आदेशाने तेलंगना सिमा नाक्यावर एसीबी ने शिवाजी विभुते यांना 500 रुपयाची लाच घेतांना रंगेहात पकडले त्यांचे सूत्रधार हे किरण मोरे आणि आनंद मेश्राम असतांना त्यांच्यावर गुन्हे दाखल का होत नाही? शिवाय RTO कार्यालयात किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्या स्वाक्षऱ्या शिवाय कुठलीही रजिस्ट्री होत नाही तिथे मृत व्यक्तीला जिवंत दाखवून रजिस्ट्री केल्या जाते अशावेळी किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला हवे पण ते होत नाही ही कसली पोलीस यंत्रणा आहें आणि ते कसलं लाचलुचपत डिपॉर्टमेंट आहें जे स्वतःच या प्रकरणात लाच घेतल्याच्या आरोपात वावरत आहें, एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय ही लोकशाहिला घातक बाब असून किरण मोरे आणि आनंद मेश्राम यांच्यावर गुन्हे दाखल झालेच पाहिजे यासाठी आता सर्व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन लढा देणं महत्वाचं आहें.