मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेवर 25 मार्च ला सरकार व बैंकेच्या सिइओ मार्फत काय उत्तर दाखल होणार?
चंद्रपूर :-
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत कोट्यावधी चा भ्रष्टाचार झाल्याने व नियमबाह्य पद्धतीने नोकर भरती घेतल्याने सहकार आयुक्तांना चौकशी चे आदेश दिले, दरम्यान याबाबत चंद्रपूर जिल्हा उपनिबंधक सारडा यांच्याकडे प्राथमिक चौकशी चे आदेश विभागीय सहनिबंधक वानखेडे यांनी दिले मात्र सात दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे विभागीय सहनिबंधक यांच्या पत्रात नमूद असतांना आज जवळपास महिना उलटला तरी साधी भ्रष्टाचारात तुडुंब बुडालेले सिइओ कल्याणकर यांनी आपले दास्तावेज जिल्हा उपनिबंधक सारडा यांना मिळाले नसल्याने सिइओ कल्याणकर यांची मुजोरी कुणाच्या बळावर चाललीय हा मोठा गंभीर प्रश्न असून बिचाऱ्या त्या दिवसरात्र अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना डावलून पैशासाठी कमी शिकलेल्या व पात्र न ठरलेल्या विद्यार्थ्यांना पास करून त्यांना नियुक्ती पत्र दिल्याने मोठा आक्रोश व्यक्त होतं आहें.
सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत मागासवर्गीय एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील बेरोजगार तरुणी तरुणांना डावलंल्याने आरक्षण बचाव संघर्ष कृती समिती च्या माध्यमातून बैंकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व सिइओ विरोधात तब्बल 28 दिवसाच्या आंदोलनानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी चौकशी चे आदेश दिले होते, त्या संदर्भात संथ गतीने चौकशी सुरु असल्याचा बनाव दिसत आहें, मात्र या चौकशीला घाबरून बैंक सिइओ कल्याणकर व कार्यकारी संचालक मंडळ काय वेगळी रणणिती करताहेत हेच कळायला मार्ग नसून आता विभागीय सहनिबंधक वानखेडे यांनी पाच सदस्यीय समिती तीन ते चार दिवसात चौकशी करेल असे म्हणत आहें, दरम्यान मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे व इतर दोन विद्यार्थ्यांनी मुंबई उच्चं न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती, त्या संदर्भात उच्चं न्यायालयाने सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत नियम डावलून जी नोकर भरती केली त्याबद्दल बैंकेच्या प्रशासनाला व राज्य सरकारला येणाऱ्या 25 मार्च 2025 पर्यंत उत्तर सादर करण्याची नोटीस बजावली आहे. त्यामुळे किमान न्यायालयातून तरी सिडीसीसी बैंकेची भ्रष्ट नोकर भरती लवकरच रद्द होण्याचे संकेत आहें.
बैंकेच्या सत्ताधारी संचालकांची धावाधाव तर नोकरीवर लागलेले परेशान?
सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीची एकीकडे एसआयटी चौकशी सुरु झाली तर दुसरीकडे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात तीन याचिका दाखल आहें, त्याची सुनावणी येत्या 25 मार्च ला होणार आहें तर इकडे एसआयटी चौकशीत बैंकेच्याआक्रोश नोकर भरतीची जाहिरात पासून तर लावलेला परीक्षेचा निकाल व दिलेले नियुक्तीपत्र इथपर्यंत चौकशी होणार आहें, यामध्ये बैंकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सिइओ कल्याणकर यांची धावाधाव सुरु असून त्यांची मोठी कसोटी लागणार आहें, कारण संपूर्ण नोकर भरतीच बेकायदेशीर मार्गाने व नियम डावलून झाल्याने सगळे संचालक मंडळ पेचात पडून आहें तर दुसरीकडे ज्यांनी 25 ते 40 लाख नोकरी करिता दिले व त्यांना नियुक्त्या दिल्या ते आपली नोकरी जाईल या भीतीने परेशान आहें.दरम्यान आता उच्च न्यायालयात सिइओ कल्याणकर काय उत्तर देतात आणि चौकशी समिती समोर कुठले डावपेच आखतात याकडे चंद्रपूर जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागलेले आहें.