धक्कादायक :- बोगस लेआऊट मध्ये एमएसिबीच्या परवानगी शिवाय स्टेट लाईट 24 तास सुरु.
इकडे तहसीलदार नोटीस पाठवतात तर दुसरीकडे इलेक्ट्रिक मीटर नसताना स्टेट लाईट सुरु कसे?
भूखंड पंचनामा भाग – 6
चंद्रपूर :- चंद्रपूर शहराच्या सतत वाढत असलेल्या लोकसंख्येच्या आणि विकासाच्या दृष्टीने भूखंड माफियांचा वचक चंद्रपूरच्या उपनगरांमध्ये वाढल्याचे समोर आले आहे. वृंदावन नगर, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर यांसारख्या भागांमध्ये बोगस नोटरी रजिस्ट्रीद्वारे भूखंडांची विक्री सुरू असून, या विक्रीत एमएसिबी (MSCB) चे स्टेट लाईट २४ तास सुरु ठेवले जात आहे, परंतु यामध्ये एक मोठा गैरवापर समोर आला आहे, तो म्हणजे या स्टेट लाईटसाठी मीटर नसून येथिल नागरिकांनाच्या घरातील लाईट पण बिना मीटरने सुरू? असल्याचे दिसून येत आहे. यामुळे (MSCB) एमएसिबी कर्मचारीही या प्रक्रियेत सहभागी असल्याचे उघड झाले आहे.
News reporter :- अतुल दिघाडे
तसेच, या भागांतील काही भूखंडांना अधिकृत रजिस्ट्रेशन नाही आणि त्या भूखंडांवरून पक्क्या रस्त्यांसह लाईट सुविधा उपलब्ध नाहीत. परंतु भूखंड माफियांनी या भागांतील कच्च्या रस्त्यांवर आणि अकृषक जमिनीत अनधिकृतपणे रजिस्ट्री दाखवून विक्री सुरु केली आहे. यामुळे अनेक नागरिकांना या विक्रीची फसवणूक सहन करावी लागली आहे.
प्रशासनाने या परिस्थितीला गांभीर्याने घेत त्वरित कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्या कडे तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रशासनाने या माफियांच्या धाडसाला चाप लावण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले आहे. भविष्यात अशा प्रकारच्या अनधिकृत विक्रीला त्वरित प्रतिबंध केला जाईल.
पाहा इरई नदीकाठावर भूखंड माफियांचा दबदबा:
इरई नदीकाठावर असलेले दाताळा, कोसारा, चोराळा, देवाडा, आरवट, हिंगणाळा, शिवणी चोर, बोररीठ, पडोली, खुटाळा, राष्ट्रवादी, तुलसी नगर, वृंदावन नगर यांसारख्या भागांमध्ये भूखंड माफियांचा दबदबा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या माफियांनी अल्प किमतीत भूखंड विकत घेऊन ते अनधिकृतपणे विकण्याचा घातक धंदा सुरू केला आहे.
प्रशासनाचे उपाय आणि महत्त्वाची सूचना:
प्रशासनाने या प्रकरणाची सखोल तपासणी सुरू केली आहे. दोषींविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी प्रशासनाशी सहकार्य करणे आवश्यक आहे. खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका आणि अशा प्रकारच्या फसवणुकीला बळी पडल्यास त्वरित प्रशासनाला सूचित करा.
नागरिकांना प्रशासनाची महत्त्वाची सूचना:
खोट्या आश्वासनावर विश्वास न ठेवा.
जर तुम्ही अशा भूखंड विक्रीत अडकला असाल, तर त्वरित प्रशासनाला माहिती द्या.
प्रशासनाच्या तपासणीत सहकार्य करा आणि भविष्यात अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी प्राधिकृत मार्गाचा अवलंब करा.
नागरिकांचे संरक्षण आणि सुरक्षितता:
चंद्रपूर प्रशासनाच्या कडक कारवाईमुळे भूखंड माफियांच्या छावणीला मोठा धक्का बसणार आहे, आणि भविष्यात नागरिकांना अधिक सुरक्षित, पारदर्शक विक्री प्रक्रिया अनुभवता येईल. प्रशासनाचे कृत्य नागरिकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.