एसीबी च्या पथकाने 500/- रुपयांची लाच घेतांना रंगेहातअटक केलेल्या सहाय्यक निरीक्षक विभुतेची नार्को टेस्ट केल्यास भंडाफोडा होणार ?
RTO चा पंचनामा भाग -1 :-
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, सहाय्यक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम आणि इतर परिवहन अधिकाऱ्यावर तेलंगना सिमा नाक्यावर अवैध वसुलीचे गंभीर आरोप करून मागील वर्षी मनसे पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती व या संबंधाने ईडी कडे पण तक्रार केली होती, मात्र सगळ्यांना घेऊन देऊन अवैध वसुलीचा मास्टर माइंड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे व सहाय्यक परिवहन अधिकारी आनंद मेश्राम यांनी यातून अर्थपूर्ण तोडगा काढला होता,दरम्यान आता त्यांच्याच आदेशाने तेलंगना सिमा नाका असलेल्या लक्कडकोट नाक्यावर 500 रुपयाची लाच घेतांना एसीबीच्या अमरावती पाथकाने सहाय्यक मोटार निरीक्षक शिवाजी विभुते यांना रात्री 21 फेब्रुवारीला रंगेहात अटक केली होती यावरून मनसे कडून केल्या गेलेल्या तक्रारी वरून अगोदरचं RTO च्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कार्यवाही केली असती तर एवढा मोठा अवैध वसुलीचा भंडाफोड झाला नसता, मात्र पापाचा घडा शेवटी भरतोच तो घडा आता भरला असून भ्रष्टाचारी किरण मोरे व आनंद मेश्राम यांच्या आदेशाने ट्रक मालकाकडून होणाऱ्या एंट्री फी च्या नावावर अवैध वसुली चा भंडाफोड झाला आहे. परंतु 500/- रुपयाच्या लाच प्रकरणी अटक झालेल्या सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते यांची नार्को टेस्ट केल्यास RTO किरण मोरे व आंनद मेश्राम यांची नावे समोर येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकते व त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ सकते असे चित्र दिसत आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे हे अगोदर जळगाव येथे सहाय्यक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत होते, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वभंर शिंदे यांच्या बदली नंतर त्यांची इथे वर्णी लागली, या संधीचा फायदा घेऊन मोरे यांनी आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना देऊन भ्रष्टाचाराचा मायाजाळ सर्वत्र पसरवला आणि महिन्याला एवढे कोटी जमा झाले पाहिजे याची रणणिती आखली, दरम्यान सिमा नाके केंद्र शासनाने अगोदरच बंद केले असतांना व त्या ठिकाणी RTO चे काहीएक काम नसताना किरण मोरे यांनी अवैध वसुली करिता अगोदर पासून एंट्री फी च्या नावाखाली सुरु असलेली वसुली सूरु ठेवली ज्यामुळे दररोज किमान 3 ते 5 लाख रुपयाची वसुली सुरु केली तर RTO कार्यालयात एजंट चे जाळे विणून त्यांनी दिवसाला सरकारी फी आणि पेनाल्टी वगळता किमान 4 ते 6 लाख रुपयाची वसुली सुरु केली तर जिल्ह्यातील 10 हजार पेक्षा जास्त असणाऱ्या ट्रक हायवा व इतर जडवाहतूक वाहनाकडून महिन्याकाठी जवळपास 4 कोटीच्या वसुलीचे टार्गेट ठेवले आहे आणि हा व्यवहार व्यवस्थित पारदर्शक पद्धतीने सुरु असून सर्व RTO अधिकारी कर्मचारी यांना त्यांचा त्यांचा हिस्सा मिळतं असल्याने व राजकीय पुढारी पत्रकार यांची महावार देणगी घरापोच पोहचत असल्याने किरण मोरे हे स्वतःला अगदी “मी नाही त्यातली”ह्या भूमिकेत सर्वाना मूर्ख बनवत आहे. मात्र आता सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते यांच्या अटकेने किरण मोरे व आनंद मेश्राम यांचे धाबे दणाणले असून महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेकडून एसीबीच्या पोलीस अधीक्षक यांच्याकडे RTO सहाय्यक निरीक्षक यांच्या नार्को टेस्ट च्या मागणी मुळे किरण मोरे व आनंद मेश्राम यांची नावे समोर येऊन ते एसीबी च्या विळख्यात सापडू शकते पर्यायाने त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकते व त्यांना कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जातं आहे. पण आजपर्यंत चौकशी च्या तावडीतून अर्थपूर्ण नितीने स्वतःची सुटका करून घेणारे मोरे व मेश्राम हे एसीबी च्या विळख्यातून कसे सुटतात हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहे.