माजी अध्यक्ष पाऊणकर सारखे रावत, कल्याणकर वर आरोप निश्चित होणार, विशेष लेखापरीक्षक बनसोड यांना विभागीय सहनिबंधक यांनी दिली जबाबदारी.
चंद्रपूर :-
राज्यात चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या बेकायदेशीर पणे घेतल्या गेलेल्या नोकर भरतीची जोरदार चर्चा झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैंकेच्या या नोकर भरतीची एसआयटी चौकशी करण्याचे निर्देश दिले आहे, दरम्यान कोट्यावधी रुपयाची माया गोळा केल्याचा आरोप ज्या बैंक अध्यक्ष संतोष रावत व सिइओ कल्याणकर यांच्यावर आहे आता त्यांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ८१ (३) (क) मध्ये असलेली तरतुद व महाराष्ट्र शासन, सहकार व वस्त्रोद्योग विभाग, मुंबई यांचे आदेशाने विभागीय सहानिबंधक प्रवीण वानखेडे यांनी विशेष लेखापरीक्षक बनसोड यांना
30 दिवसात चौकशी करून आरोप निश्चित करण्याचे आदेश दिल्याने माजी अध्यक्ष मनोहर पाऊणकर यांच्यावर ज्या विशेष लेखापरीक्षक गोडे यांनी लेखापरीक्षण करून त्यांच्यावर आरोप निश्चित केले त्याचं प्रकारे संतोष रावत व सिइओ कल्याणकर यांच्यावर पण आरोप निश्चित होण्याची शक्यता असल्याने कोट्यावधीच्या नोकर भरती घोटाळ्यानंतर बैंकेच्या अंतर्गत घोटाळ्याची सुद्धा जबाबदारी वरील दोघांवर येत असल्याने बैंकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.
विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखेडे यांनी आदेशात म्हटले आहे की चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, चंद्रपूर या बँकेच्या सन २०१९ ते २०२३ या कालावधीतील सोबत जोडलेल्या परिशिष्टात नमुद १ ते ११ बार्बीवरील आर्थिक व्यवहारांची सखोल तपासणी करुन खरे व अचुक चित्र जाणुन घेण्यासाठी एस. एस. बनसोड, विशेष लेखापरीक्षक वर्ग-२, सहकारी संस्था, चंद्रपूर यांची चाचणी लेखापरीक्षणाकरीता लेखापरीक्षक म्हणुन नियुक्ती करण्यात आली आहे.त्यानी सदर्ह बँकेच्या आर्थिक व्यवहारांचे चाचणी लेखापरीक्षण पुर्ण करुन चाचणी लेखापरीक्षणाचा अहवाल स्पष्ट अभिप्रायासह ३० दिवसाच्या आंत सादर करावा.
काय आहे बैंक अध्यक्ष रावत व सिइओ वर आरोप?
सन २०१९- २०२० मधील डेड स्टॉक खरेदी व सन २०२० – २०२१ मध्ये ११ शाखा काउंटर, केबीन व फर्निचर बाबतचा व्यवहार.
सन २०१९ ते २०२३ या कालावधीतील संपुर्ण कर्जाची तपासणी (कर्ज वाटप, वसुली, थकीत कर्ज, थकीत कर्ज वसुली कार्यवाही आणि एन.पी.ए तपासणी तसेच कर्जप्रकरणे)
सन २०१९ ते २०२३ या कालावधीतील राजूरा, बल्लारपूर, चंदनखेडा व बाळापूर येथील इमारत बांधकाम/दुरुस्तीवर केलल्या खर्चाची तपासणी
सन २०१९ ते २०२३ या कालावधीतील वरोरा शेतकी भवन बांधकाम व सिमेंट कॉक्रीट ब्लॉक व जागा लेव्हल करण्याबाबतच्या खर्चाची तपासणी.
सन २०१९ ते २०२३ या कालावधीतील शाखा सावली स्थानंतरन व अंतर्गत सजावट तसेच किरायात वाढ या संदर्भातील व्यवहारांची तपासणी.
सन २०१९ ते २०२३ या कालावधीतील सोलार पॅनल देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करुन त्याचा वापर न केल्याने विद्युत देयकापोटी अवास्तव खर्च केल्यामुळे बँकेचे झालेले नुकसान.
सन २०१९ ते २०२३ या कालावधीतील शेतकरी कल्याण निधी वितरणा संदर्भातील व्यवहारांची तपासणी
सन २०२०-२१ व २०२१-२२ मध्ये चालू पिक कर्जाची वसुली थकित रुपांतरण कर्जा मध्ये दाखवून एन.पी.ए. कमी केला.
२०२०-२०२१ ते २०२२-२३ या कालावधीत संगणकीकरण व देखभाल खर्च व राउटर खरेदी, संगणक हार्डवेअर खरेदी संदर्भातील तपासणी.
सन २०२० ते २०२३ या कालावधीत बँकेच्या सर्व शाखांमध्ये महाकालीचा फोटा लावण्यावर केलेला खर्च.
नोकर भरती बाबत जास्तीचे पदे निर्माण करण्यासाठी बढत्या देवून जास्तीचे पदे दर्शविणे.