RTO कार्यालयातील सिसिटीव्ही उपलब्ध नसले तरी अपीलकर्त्याने सर्व विडिओ न्यायालयात सादर केल्याने कलम १५६(३) अंतर्गत कारवाईचे संकेत?
RTO चा पंचनामा भाग -11
चंद्रपूर प्रादेशिक परिवहन कार्यालयात मागील अनेक वर्षांपासून खाजगी एजंट च्या हातात सरकारी फाईल देतं त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात गाडीचे रजिस्ट्रेशन, लायसन्स, पासिंग, ट्रान्सफर इत्यादी च्या कामासाठी अतिरिक्त पैसे घेऊन RTO कार्यालयात भ्रष्टाचाराचा नंगानाच सुरु असताना त्या विरोधात कुणी आवाज उठवला की याचं कार्यालयातील अधिकारी पोलिसांत तक्रार देतात आणि खंडणी मागितली म्हणून आरोप करून त्यातून आपली सुटका करून घेतात हा नित्यक्रम सूरू आहें, दरम्यान या या कार्यालयात ज्या ज्या टेबल वर जी कामे आहेत त्या त्या टेबल वर त्या कामासाठी अतिरिक्त किती पैसे मोजावे लागतात याची एक चित्राफित सामाजिक कार्यकर्ते नयन साखरे यांनी स्वतः RTO कार्यालयात जाऊन मोबाईल द्वारे चित्रफित केली व ती रामनगर पोलीस स्टेशन मध्ये देऊन त्या आधारे संबंधित अधिकाऱ्यावर व एजन्ट वर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली, त्यात त्यांनी मृत व्यक्तीला जिवंत दाखवून वाहनाचे रजिस्ट्रेशन केल्याचे पुरावे पण दिले होते, मात्र सगळे पुरावे पोलीस स्टेशनं मध्ये दाखल केल्यानंतर सुद्धा संबंधित RTO अधिकाऱ्यावर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले नाही त्यामुळे नयन साखरे यांनी कलम १५६(३) अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यासह RTO अधिकारी आणि त्या कार्यालयात काम करणाऱ्या एजंट वर कारवाई व्हावी यासाठी त्यांनी न्यायालयात (केस क्रमांक 156/2022) केस दाखल केली. आता ही केस न्यायालयात स्टॅन्ड झाली असून या केस मध्ये संबंधित अधिकारी आणि एजंट वर गुन्हे दाखल होणार असल्याचे संकेत मिळतं आहें.
RTO कार्यालयात चाललेल्या भ्रष्टाचाराला कित्तेक नागरिक बळी पडत असतांना कुणी यावर जाहिरपणे बोलत नाही, सर्वसामान्य माणसाची वाहने चालन करत त्यांच्याकडून पैसे उकळणारे RTO अधिकारी यांनी पैसे वसुली करिता या कार्यालयात दलाल (एजन्ट) नेमले आहें, RTO चे वाहन जिल्हाभर फिरतात आणि वाहन चालक मालक यांच्याकडून केवळ आणि केवळ वसुली करतात त्यात बिचारे सामान्य व्यक्ती बळी पडतात, ज्यांच्याकडे पेट्रोल डिझेल टाकण्यासाठी पैसे नसतात त्यांना चालन च्या नावाखाली RTO अधिकारी जणू लुटत आहें, त्यांच्या या लुटीची कहाणी एवढी भयंकर आहें की त्यातून हे दरमहा कोट्यावधी रुपये कमावतात, एंट्री फी च्या नावाखाली व सिमा नाक्यावर तर एजन्ट द्वारे दरमहा कोट्यावधीची जबरण वसुली सुरु आहें, मात्र आता त्या सिमा नाक्यावर सहाय्यक निरीक्षक शिवाजी विभुते याला 500 रुपयाची लाच घेतांना अमरावती च्या टीम ने रंगेहात अटक केल्याने RTO अधिकाऱ्याच्या भ्रष्टाचाराचं पितळ उघडं पडलं आहें, त्यातच भूमिपुत्राची हाक न्यूज पोर्टल वर सुरु असलेल्या RTO चा पंचनामा जनतेचा आवाज बनला आहें, त्यामुळे आता किरण मोरे आणि आंनद मेश्राम यांचे धाबे दणाणले असून आमदार किशोर जोरगेवार यांच्या विधिमंडळातील लक्षवेधीने किरण मोरेची उचलबांगडी होत आहें, त्यामुळे आता समोर काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहें.
कोण आहेत यामध्ये आरोपी?
नयन साखरे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या कलम १५६(३) अंतर्गत कारवाई करिता जी अपील दाखल केली होती ती न्यायालयाने स्वीकारली असून या केस मध्ये ज्यांच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत त्यात RTO अधिकारी किरण मोरे, आंनद मेश्राम यांच्यासह तत्कालीन पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, विजय कुमार साळुंके, गजेंद्र नागपूरे, विशाल बावटे, श्रीनिवास जेल्लावार, कलबरसिंग कलसी, अमोल मलथने, निलेश भगूरे, गोविंद पवार, विलास ठेंगे, मनीषकुमार मडके, विशाल कसंबे, सुनील पायघन, अमित काळे, विवेक तास्के, तुषार हटवार, चेतन गहुकर, नरेंद्र उमाले, विष्णू कुंभालकर, अमन अन्सारी, दुर्गा चौरे इत्यादीचा समावेश आहें.