मनसेतर्फे तत्कालीन अधीक्षक संजय पाटील यांच्या कार्यकाळात दिलेल्या मद्य परवान्याच्या चौकशी चीं केली होती मागणी.अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण 7 व 8 एप्रिल ला चंद्रपुरात.
चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्याची दारूबंदी उठल्यानंतर जिल्ह्यात नव्याने शेकडो मद्य परवाने बेकायदेशीरपणे वाटप झाल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी यांच्यासह राज्याचे तत्कालीन राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांच्याकडे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय संघटनाच्या नेत्यांनी केल्या होत्या, यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्या कारभारावर टिका करत त्याच्या कार्यकाळात दिलेली सर्व मद्य परवाने ही बेकायदेशीर असून याची उच्चस्तरीय चौकशी करा अशा अशायाचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यासह राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री यांना दिले होत, दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील हे चंद्रपूर लालुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले कारण त्यांच्या सांगण्यावरून उपनिरीक्षक चेतन माधवराव खरोडे, कार्यालय अधिक्षक खटाल यांना एक लाख रुपयाची लाच घेतांना एसीबी च्या पथकाने रंगेहात पकडले होते, त्यामुळे ज्यांना ज्यांना नवीन परवाने दिल्या गेले त्यात मोठा भ्रष्टाचार झाला आणि ते परवाने बेकायदेशीर देण्यात आल्याच्या तक्रारी मनसे कडून करण्यात आल्या होत्या.
दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील मद्य परवाने मंजुर करतांना मोठ्या प्रमाणात झालेला गैरव्यवहार, झालेली अनियमितता व अधीक्षक संजय पाटील यांच्या लाचखोरीच्या प्रकरणी तपास करण्यासाठी एसआयटी चौकशी नेमण्यात आली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस आयुक्त संदिप दिवाण यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एआयटी) आता चौकशी करणार आहें, यासाठी तपासाच्या अनुषंगाने 7 व 8 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत विशेष तपास पथकाचे (एसआयटी) अध्यक्ष संदिप दिवाण हे तपास पथकासह चंद्रपूर विश्राम गृह येथे येत आहेत.
ज्यांना कुठल्याही बेकायदेशीरपणे वाटतं असलेल्या मद्य परवाने बाबत तक्रारी करायच्या आहें त्यांना संधी.
चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठविल्यानंतर (शासन अधिसूचना दिनांक 8 जून 2021 नंतर) जिल्ह्यात नुतनिकरण करून कार्यान्वीत करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्ती, नव्याने मंजुर करण्यात आलेल्या अबकारी अनुज्ञप्ती, नव्याने मंजुर करण्यात आलेल्या / इतर जिल्ह्यातून स्थलांतरीत होवून आलेल्या अनुज्ञप्ती (प्रकारानुसार : सीएल-3, एफएल-3, एफएलबीआर-2 इ.) या आक्षेपाबाबत आणखी काही तक्रारी असतील किंवा यातील आक्षेपाच्या अनुषंगाने काही माहिती असेल, अशा व्यक्ती / तक्रारदार हे त्यांचेकडील कागदपत्रांसह विशेष तपास पथकास (SIT) 7 व 8 एप्रिल रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेस चंद्रपूर विश्राम गृह येथे समक्ष येवून भेटु शकतात, असे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले आहे.
शेकडो मद्य परवाने रद्द होणार?
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील व वरोरा येथील निरीक्षक थोरात यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या सर्व मद्य परवाने तपासल्या जातं असून सगळे नियम धाब्यावर बसवून व कुठलीही मोका चौकशी न करता परस्पर परवाने मंजूर करण्याचे काम पैसे घेऊन करण्यात आले होते त्यावर आता एसआयटी चौकशी ने पडदा उघडणार असून सगळ्यां बेकायदेशीर मद्य परवाने धारक धास्तावले आहें, या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून सतत पाठपुरावा सुरु असल्याने लवकरच शेकडो परवाने रद्द होण्याचे संकेत मिळतं आहें.