Home चंद्रपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ग्रंथप्रदर्शनी व वाचन स्पर्धा :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ग्रंथप्रदर्शनी व वाचन स्पर्धा :

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ग्रंथप्रदर्शनी व वाचन स्पर्धा : विद्यार्थी, शिक्षक व वाचनप्रेमींसाठी एक प्रेरणादायी उपक्रम

चंद्रपूर :- १५ एप्रिल २०२५,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची सखोल ओळख व त्यांच्या प्रेरणादायी जीवनाचा अभ्यास विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित जनता महाविद्यालयाच्या ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे तीन दिवसीय “ग्रंथप्रदर्शनी व वाचन स्पर्धा” या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम दिनांक १५ एप्रिल ते १७ एप्रिल २०२५ या कालावधीत दररोज सकाळी *७.३० ते १२.३० या वेळेत महाविद्यालयाच्या लायब्ररी रीडिंग रूम मध्ये पार पडणार आहे.

News report :- अतुल दिघाडे

या उपक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे*व प्र. प्राचार्य डॉ. आशिष के. महातळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, तत्त्वज्ञान व कार्य समाजात रुजवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधानकार असून त्यांनी सामाजिक न्याय, समता, बंधुता व शिक्षण या मुल्यांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे विचार आजही तरुणाईसाठी दिशादर्शक ठरत आहेत. या ग्रंथप्रदर्शनीमध्ये त्यांच्या जीवनावर आधारित मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांतील दुर्मिळ व अभ्यासपूर्ण पुस्तके विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आली आहेत. या पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आंबेडकर विचारसरणीचा सखोल अभ्यास करता येणार आहे.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात विद्यार्थ्यांसाठी वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये केवळ वाचनाची गोडी वाढणार नाही, तर त्यांना आपल्या अभ्यासातही नवीन दृष्टीकोन प्राप्त होणार आहे. वाचनानंतर विद्यार्थ्यांना आपले विचार सादर करण्याची संधीही दिली जाणार आहे, ज्यामुळे विचार मांडणी व भाषाशैली यांचाही विकास होणार आहे.

या उद्घाटन कार्यक्रमाला महाविद्यालयाचे विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. के. सी. पाटील*, प्रबंधक श्री. डी. यू. अडबाले, तसेच विविध विभागांचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल डॉ. पी. बी. चहारे* कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. टी. बलकी आणि *प्रा. गणेश येरगुडे यांनी विशेष परिश्रम घेतले. ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व वाचनप्रेमींना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी केवळ माहितीचे भांडार नसून, त्यांच्या विचारविश्वाचा विस्तार करणारा आणि सामाजिक जाणिवा समृध्द करणारा ठरणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मार्गदर्शन हे आजच्या काळात अधिक समर्पक ठरत असल्याने, अशा उपक्रमांची गरज व परिणामकारकता अधिक ठळकपणे समोर येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here