भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शोभायात्रेचे स्वागत!
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर:-गांधी चौक, चंद्रपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त निघालेल्या भव्य शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा क्षेत्राच्या वतीने स्वागत मंच उभारण्यात आला होता.
या शोभायात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या समाज बांधवांचे मनःपूर्वक स्वागत केले. यावेळी शोभायात्रेत सहभागी बांधवांना शीतपेय वाटप केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचारांचा प्रकाश मार्गदर्शक आहे. त्यांच्या दूरदृष्टीतून घडवलेले संविधान, समतेचा आणि सामाजिक न्यायाचा मंत्र आजही प्रत्येक भारतीयाला प्रेरणा देतो.