कुठले कुठले मद्य परवाने अडचणीत? कार्यवाहीच्या भीतीने कित्तेकांनी आपली दुकाने बंद केली असल्याने सनसनी.
चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी हटवल्यानंतर नवीन मद्य परवाने वाटप व जुन्या परवान्याचे स्थलांतरण करताना राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांनी परवाने देतांना कुठलिही मोका चौकशी न करता व नियमानुसार खरोखरच स्थिती नसताना या संदर्भात अनेक सामाजिक संघटनासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनेक प्रकरणात अनियमितता आढळल्याने शासनाने चौकशीची मागणी केली होती, दरम्यान माजी मंत्री सुधीर मुंगनटीवार यांनी सुद्धा याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एसआयटी चौकशी ची मागणी केली होती, त्यामुळे उशिरा का होईना नवीन मद्य परवाने व परवाने स्थलांतरन यासाठी कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टचार झाल्याने व अधीक्षक संजय पाटील यांना एसीबी ने अटक केल्यानंतर शासनातर्फे एआयटी लावण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले, दरम्यान एसीबीच्या अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांचे अध्यक्षातेखाली एआयटी पथक नेमण्यात आले आणि चौकशला सुरुवात झाली,
एसआयटी चौकशी लागल्यानंतर ज्यांना यांना बेकायदेशीर मद्य परवाने दिले व यांचे स्थलांतरण झाले त्यापैकी कित्तेकांनी आपले दुकान बंद केले तर एका वाईन शॉपी लायसन्स धारकांनी तर आपले दुकान स्थलांतरण केले त्यामुळे एसआयटी चौकशी जी सुरु आहें त्यात कित्येकाची देशी विदेशी दारूचे दुकान बंद होणार असल्याचे संकेत मिळतं आहें.
काय आहें मद्य परवाने देण्याचे नियम?
खरं तर एखाद्या बिअर बार ला परवानगी देतांना तिथे किमान रेस्टॉरंट अगोदर सुरु असायला हवं, तिथे पार्किंग ची व्यवस्था हवी, तिथे किचन रूम, परमिट रूम व स्टोअर रूम असायला हवी, सौचालय आवश्यक आहें, शिवाय जुने मद्य परवाने स्थलांतरण करताना किंवा नवीन परवाने मंजुरी करतांना सदर इमारत किंवा गाळ्याचे बांधकाम अधिकृत असणे गरजेचे आहे. मंजुरी देण्यापूर्वी ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेची एनओसी घेतांना स्थानिक स्थरावर आमसभा घेणे गरजेचे आहें आणि ज्या ठिकाणी मद्य दुकान होणार आहें त्या ठिकाणापासून मंदिर, शाळा, सार्वजनिक सभागृह, शासकीय कार्यालये यामधील अंतर नियमानुसार आहें का याबाबत या सक्षम अधिकाऱ्याने मौका चौकशी करून तसा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाला देणे गरजेचे आहें, सोबतच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक निरीक्षक यांनी तसा अहवाल तयार केल्यानंतरचं जिल्हाधिकारी यांच्याकडे अंतिम मंजुरी करिता प्रस्ताव पाठवला पाहिजे परंतु सगळे नियम डावलून अधीक्षक संजय पाटील यांनी व त्यांच्या अधीनस्त निरीक्षकांनी जे बनावट प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकारी यांची दिशाभूल केली आज त्याचं परिस्थितीची चौकशी होणार आहें, आता या धास्तीने कित्तेकांनी आपली दुकाने बंद केली आहें तर त्यात काही आपोआप बंद होणार तर काही बेकायदेशीर दुकाने बंद पाडल्या जाणार असल्याची शक्यता बळावली आहें.
आता पण तक्रारी करू शकता.
एसीबीच्या अप्पर पोलीस आयुक्त संदीप दिवाण यांचे एआयटी पथक मुंबई रवाना झाल्यानंतर सुद्धा अनेकांनी तक्रारी देण्याची इच्छा व्यक्त केली होती, दरम्यान या संदर्भात एआयटी प्रमुख दिवाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आता सुद्धा स्थानिक एसीबी कार्यालयात तक्रारी स्वीकारल्या जाणार असल्याचे सांगितले, त्यामुळे आता सर्वदूर पर्यंत पसरलेले बिअर बार, बिअर शॉपी आणि वाईन शॉपी याविषयीं तक्रारी कुणीही करू शकतात.
कुठले कुठले मद्य परवाने अडचणीत?
जैन मंदिराच्या मागे असलेल्या केबी बियर शॉपी चे अंतर मंदिराच्या प्रवेशद्वारापासून केवळ 30 मीटरवर आहे. परंतु तालुका भूमी अभिलेख कार्यालयाने हे अंतर 50 मीटर असल्याचा अहवाल राज्य उत्पादन शुल्क विभागाला दिला. रघुवंशी कॉम्प्लेक्सच्या दोन्ही बाजूला लागून शाळा असताना या ठिकाणी पोलीस विभागाने चुकीचे अहवाल दिले. नागपूर रोडवरील महालक्ष्मी टावर,दाताळा रोडवरील प्रवीण जुमडे यांच्या इमारतीमधील ,श्रीकृष्ण टॉकीज जवळील कॉम्प्लेक्स मध्ये तसेच नागवी येथील वैभव पिसे यांच्या घरी असलेले देशी दारू दुकान इत्यादी दारू दुकानांचे परवाने अडचणीत येत आहें. भद्रावती शहरात ऐन बाजारात गोंदिया जिल्ह्यातील अशोक कुमार किसनलाल जयस्वाल यांचा देशी दारू दुकान परवाना (CL-III) अनिल धानोरकर यांनी विकत घेतला व भाजीपाला मार्केट मध्ये नगरपरिषद च्या गाळ्यात मालमत्ता क्रमांक 368 मध्ये देशी दारू दुकान सुरु केले, यामध्ये 100 मिटरवर मुलींची शाळा आहें, बालाजी मंदिर आहें, मस्जिद आहें व विशेष म्हणजे या देशी दारू दुकानाला स्थानिक लोकांनी विरोध केला होता, पण लाखोची लाच घेऊन ह्या देशी दारू दुकानाचे स्थानांतरण करण्यात आले. चंद्रपूर शहरलगत दुर्गापूर परिसरात गोंदिया वरून डावरा वाईन शॉप सुमित्रा नगर दुर्गापूर खात्री कॉलेज जवळ आणण्यात आली ती लोवस्तीत असून त्या वाईन शॉपी च्या बाजूला टेबल खुर्ची लावून दारू प्यायला दिल्या जातं आहें आणि या परिसरातील छोट्या छोट्या रोडवरील अवैध दारू विक्री करणाऱ्यांना दारू सप्ल्याय केल्या जाते. यासाठी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची अवैध वसुली चालतेय, तर ctps च्या कोयना गेट जवळ तर याचं वाईन शॉपी मधून जाणारी देशी विदेशी दारू खुलेआम विक्री केल्या जातं आहें. सावली शहरात आर एस बार आहें जो हनुमान मंदिरा जवळ आहें आणि मुख्य चंद्रपूर गडचिरोली हयावे रोडवर आहें जो नियमाचा भंग करताहेत. सावली येथे जुने बस्टॅन्ड जवळ आशिष बार मागे लागून पुरातन माता मंदिर आहें तरीही त्याला मंजुरी दिली आहें. याचे मालक गौरव संतोषवार आहें वरोरा शहरातील चंद्रपूर नागपूर हायवे बोर्डा चौक येथे लागून 50 मीटर पेक्षा कमी अंतरावर श्री महेश महेश देवरावजी भांडेकर याच्या नावाने देशी दारू दुकान स्थानंतर करण्यात आले (CI-III L.No-122) या रस्त्याने शाळेकरी मुली ये जा करतात व जवळच नेताजी शाळा आहें.