Home चंद्रपूर चिंताजनक :- सीएसटपीएसच्या कोळसा कन्व्हेयर बेल्टमध्ये कामगार अडकून गंभीर जखमी.

चिंताजनक :- सीएसटपीएसच्या कोळसा कन्व्हेयर बेल्टमध्ये कामगार अडकून गंभीर जखमी.

चंद्रपूर च्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु, सीएसटीपीएसच्या त्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी.

चंद्रपूर:-

सीएसटपीएस कंपनीला तिरवंजा गावालगत असलेल्या भटाळी कोळसा खाणीतून कोळसा वहन करणाऱ्या कन्व्हेयर बेल्टची देखरेख व्यवस्थित होतं नसल्याने व सुरक्षेच्या दृष्टीने कुठलीही उपाययोजना संबंधित कंत्राटदार करत नसल्याने कन्व्हेयर बेल्टमध्ये कामगार अडकून गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. निलेश पिंगे असे जखमी कामगाराचे नाव असून, सध्या त्याच्यावर चंद्रपूरच्या मेहरा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याची प्राथमिक माहिती आहें. दरम्यान त्यांच्या प्रकृती मध्ये सुधार होतं नसल्याने चिंता व्यक्त केली जातं आहें. या अपघाताला संबंधित कंत्राटदार जबाबदार असून त्या कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वत्र होतं आहें.

सीएसटीपीएस कन्व्हेयर बेल्टच्या माध्यमातून कोळसा वहन करण्यासाठी एका कंत्राटदाराकडे निलेश पिंगे हा कामगार कार्यरत होता तो क्रशर मशीनमध्ये अडकलेला कोळसा काढण्यासाठी तो कन्व्हेयर बेल्टवर चढला. दरम्यान अडकलेला कोळसा अचानक मोकळा झाल्याने बेल्ट आपोआप सुरू झाला आणि निलेश यांचा डोक्याचा भाग बेल्टमध्ये अडकला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला, कन्व्हेयर बेल्टची देखभाल आणि व्यवस्थापन कंत्राटी पद्धतीने होत असून, कंत्राटदार केवळ मोजक्या कामगारांना धोका पत्करून कामावर लावतो व सीएसटी पीएस चे संबंधित अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्यानेच हा अपघात झाला असल्याची चर्चा होतं आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here