सिडीसीसी बैंकेच्या नोकर भरतीत मुलासाठी व एका नातेवाईकाला नोकरी करिता 35-35 लाख दिल्याची माहिती, सेवानिवृत्तीनंतर होणार पोलखोल.
चंद्रपूर :–
महानगरपालिकेत मागील अनेक वर्ष कार्य करणारे अभियंता विजय बोरीकर यांनी नगरपरिषद पासून तर महानगरपालिका पर्यंतचा प्रवास करतांना त्यांनी शहराच्या पाणी पुरवठा व इलेक्ट्रिक खाते सांभाळून कोट्यावधीची माया जमवाल्याची सनसनीखेज माहिती समोर आली असून नुकत्याच चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकच्या नोकर भरतीत स्वतःच्या मुलाला आणि एका नातेवाईकाला नोकरीत लावून देण्यासाठी 35-35 लाख त्यांनी बैंक संचालकांना दिल्याचे माहिती सुद्धा मिळाली आहें, दरम्यान सेवानिवृत्तीचा त्यांचा काळ नुकताच 30 एप्रिल ला पूर्ण होऊन ते सेवानिवृत्त होतं असल्यामुळे त्यांच्या भ्रष्टाचाराच्या कहाण्या जनतेसमोर येणार आहें.
महानगरापालिकेत सेवानिवृत्तीच्या काळापर्यंत शहर अभियंता म्हणून कार्यरत असणारे विजय बोरीकर यांचे काही ठराविक कंत्रादार आहेत व त्यांच्याकडून 5-10 टक्के घेऊन त्यांनी कोट्यावधीची माया जमवली असल्याचे बोलल्या जातं आहें, इलेक्ट्रिक डिपॉर्टमेंट च्या कंत्राटदार व पाणी पुरवठा कंत्राटदार या सगळ्यां मिळून महिन्याकाठी 5 लाखांच्या घरात कमिशन जातं असल्याने त्यांनी कित्तेक ठिकाणी स्थावर मालमत्ता खरेदी केली असल्याचे काही दस्तावेज गोपनीय सूत्रांकडून समोर आले आहें. त्यामुळे ईडी कडे पण तक्रार होण्याची शक्यता आहें.
प्रक्रियायुक्त सांडपानी पुनर्वापर प्रकल्पाचे कंत्राटदार यांच्याकडून ओवाळणी?
चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत असलेल्या प्रकियायुक्त सांडपाणी पुर्नवापर प्रकल्पाचे कंत्राट विश्वराज इन्वायरमेंट प्रा.लि. नागपूर या कंपनीला 25 वर्षाकरीता सार्वजनिक खाजगी भागीदारी या उपक्रमातुन देण्यात आलेले आहे. सदर प्रकल्पाची किंमत 140 करोड रूपये असून चंद्रपूर शहर महानगरपालिका 25% (20 करोड रूपये) महाराष्ट्र शासन 25% (20 करोड रूपये) आणि केंद्र शासन 50% (40 करोड रूपये) असे एकुण 80 करोड रूपये दिल्या गेले व प्रकल्पाची उर्वरीत रक्कम एकुण 60 करोड रूपये स्वतः कर्ज घेवून विश्वराज इन्वायरमेंट प्रा.लि. नागपूर कंपनीने घेऊन हा प्रकल्प उभा केला आहें, दरम्यान हे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प केंद्र शहरातील पठाणपुरा व रहमतनगर येथील ईरई नदी पात्रात सुरु करण्यात आले असून नोव्हेंबर २०२३ पासून प्रक्रिया केलेले सांडपाणी शहरातील वरील दोन्ही प्रक्रिया केंद्रातून महाजनको च्या वीज केंद्राला पुरवठा करण्यात येत असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र करारानुसार 50 MLD (दशलक्ष लिटर प्रतिदिन) पाणी वीज केंद्रात पोहचत असल्याची माहिती देण्यात येते मात्र शहरातील सांडपाणी शिवरेज ट्रीटमेंट प्लांटमधील पंपाची क्षमता ही कमी असल्यामुळे व सांडपाणी गोळा करण्यासाठी भूमिगत गटार पाईपलाईनची कनेक्टिव्हिटी पूर्ण नसल्याने एवढे पाणी वीज केंद्राला पोहचत नाही व त्यापासून महानगरपालिका अभियंता विजय बोरीकर यांनी यासाठी कोट्यावधी रुपयाची ओवाळणी घेतली असल्याची माहिती आहें,