Home Breaking News झोन,क्र,1 मधील वडगाव प्रभागात नालेसफाईस सुरुवात – मात्र मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?

झोन,क्र,1 मधील वडगाव प्रभागात नालेसफाईस सुरुवात – मात्र मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?

झोन,क्र,1 मधील वडगाव प्रभागात नालेसफाईस सुरुवात – मात्र मनपा अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष?
नालेसफाई अपुरी आणि धातुर्मातुर स्वरूपात,नागरिकांमध्ये संताप

चंद्रपूर :- वडगाव प्रभागात महानगरपालिकेच्या वतीने नालेसफाईच्या कामास कालपासून सुरुवात झाली असली तरी या कामात प्रशासनाची गंभीर दुर्लक्ष दिसून येत आहे. नालेसफाई सुरू असताना कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट दिली नसल्यामुळे काम फक्त कामगारांच्या भरोशावर चालले आहे. परिणामी, नालेसफाई अपुरी आणि धातुर्मातुर स्वरूपात होत असल्याचे चित्र नागरिकांच्या लक्षात येत आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

विशेष म्हणजे, हवेली गार्डनजवळील आकाशवाणी परिसरात पूर्वीच एकतर्फी पुलावरील भिंत बांधण्यात आल्याने पावसाळ्यात पुर येण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा ठिकाणी अधिक काळजीपूर्वक आणि सखोल नालेसफाई होणे गरजेचे असताना, सध्या सुरू असलेले अर्धवट काम पुराच्या धोका अधिकच वाढवू शकते, अशी चिंता स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत.

यंदाही जर नालेसफाई फक्त कागदावरच पूर्ण झाली, तर वडगाव प्रभागातील नागरिकांना मोठ्या पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. मनपा प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे माजी नगरसेवकांकडेही माहिती पोहचवली जात नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सध्या मनपाचे अधिकारी कोणत्याही उत्तरदायित्वाविना काम करत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

सवाल असा आहे की, नालेसफाई खरोखर होणार आहे की हे फक्त एक दिखावा आहे?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here