एन डी हॉटेल रूम नं. 112 मध्ये सुरू होता लाखोंचा ‘श्री कार्ड’ जुगार! LCB च्या धाडीत चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावतीचे गब्बर व्यापारी अटकेत
चंद्रपूर :- रविवारी सुट्टीच्या दिवशी शहरातील प्रसिद्ध *एन डी हॉटेल*च्या रूम नंबर 112 मध्ये लाखोंच्या ‘श्री कार्ड’ जुगाराचा डाव रंगलेला असताना स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अचानक धाड टाकत शहरातील नामांकित व्यापाऱ्यांना अटक केली. हा कारभार इतक्या गुप्तपणे सुरू होता की, दर रविवारी मोठमोठे व्यापारी “पत्ते पिस्सिंग” करत महफिल सजवत असत. परंतु या रविवारी या “भायो”ंचा डाव वाघाच्या डरकाळी ने भंग पावला.
News reporter :- अतुल दिघाडे
पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, एन डी हॉटेलमधील रूम नं. 112 मध्ये ‘श्री कार्ड’ नावाचा जुगार दर रविवारी रात्री रंगत असे. रविवारी रात्री उशिरा पोलिसांनी छापा टाकत सुमारे तीन लाख रुपयांची रोकड आणि श्री कार्डचे साहित्य जप्त केले. या धाडीत चंद्रपूर, बल्लारपूर, भद्रावती व पडोली येथील नामवंत व्यापाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले.
अटक झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे,
दिलीप जेठवानी, संचालक, मनोज किराणा, पडोली, संतोष शामराव आमने (भद्रावती) योगेश्वर पंडित, समीर उराडे, नारळपाणी ठोक विक्रेता, भोला दास, हमीद अजीम शरीफ, गोवर्धन चंदेल,मोठे व्यापारी, बल्लारपूर, प्रभाकर येनगनलेवार, उमेश खाटीक,
पोलिसांनी कारवाईत जप्त केलेली रोकड, मोबाइल फोन आणि जुगार साहित्य रामनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर जामीनावर सोडण्यात आले.
या धाडीनंतर व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली असून, “जेठा भाई पकडा गयो” अशा चर्चा शहरात रंगताना दिसत आहेत. दरम्यान, LCB ची ही कारवाई शहरातील इतर अशा गुप्त जुगार अड्ड्यांसाठी मोठा इशारा ठरत आहे.