जिल्ह्यातील अनेक उद्योगाचे कामगार सामील होणार.मनसे जनहीत विधी विभागाचे राज्य उपाध्यक्ष अँड संजित सरदे आणि अरुण तिवारी यांची प्रमुख उपस्थिती
चंद्रपूर :-
महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात अनेक उद्योगात महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या संघटना उभारल्या गेल्या असून कामगारावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देण्याचा सपाटा सुरु आहें, त्यामुळे अनेक उद्योगातील कामगार आता मनसेत सामील होत आहें, दरम्यान आज महाराष्ट्र दिनी व जागतिक कामगार दिनाचे औचित्य साधून स्थानिक प्रेस क्लब वरोरा नाका येथे सकाळी 11.30 वाजता भव्य कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहें,
या मेळाव्याला जनहीत विधी विभागाचे राज्य उपाध्यक्ष अँड संजित सरदे आणि अरुण तिवारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहें, या कामगार मेळाव्याचे आयोजन कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, उमाशंकर तिवारी, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, अँड अजित पांडे, रोजगार स्वयंरोजगार विभागाचे जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, शेतकरी सेनेचे आंनद बावणे इत्यादीनी केले आहें, या कामगार मेळाव्याला सर्व कामगारांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकां कडून करण्यात आले आहें.