Home गंभीर धक्कादायक :- मुख्यमंत्री फडणवीस यांची आमदार फोडाफोडी नंतर विद्यार्थ्यांची सुद्धा फोडाफोडी?

धक्कादायक :- मुख्यमंत्री फडणवीस यांची आमदार फोडाफोडी नंतर विद्यार्थ्यांची सुद्धा फोडाफोडी?

एकीकडे बोलायचं की हिंदी सक्तीची नाही आणि दुसरीकडे कोणतीही भाषा निवडायचा पर्यायचं होऊ द्यायचा नाही तर हे कसलं शिक्षण तंत्र?

मुंबई न्यूज नेटवर्क:-

महाराष्ट्राच्या मराठी अस्मितेला पायदळी तुडवून व शिक्षण तज्ञाचं न ऐकता केवळ हिंदी भाषिकांची मते घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण अमलबजावणीच्या नावाखाली हिंदी भाषेची पहिल्या वर्गपासून सक्ती केली आहें व त्या अभ्यासक्रमाचे पुस्तके पण छापायला सुरुवात करून काही ठिकाणी पुस्तके पण आली आहें, दरम्यान याविषयी फडणवीस म्हणतात की हिंदी व्यतिरिक्त दुसरी भाषा पण निवडण्याचा पर्याय विद्यार्थ्यांना आहें, पण वस्तुस्थिती अशी आहें की महाराष्ट्रात कुणी कन्नड, तेलगू, गुजराती, मल्ल्याळम इत्यादी भाषा शिकायला तयार असेल तर एका वर्गाच्या किमान 20 विद्यार्थ्यांना ती शिकावी लागेल आणि आपल्याकडे अशी 20 मुलं एकत्र येऊ शकतं नाही हे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांना सुद्धा चांगलं ठाऊक आहें, त्यामुळे हा हिंदी भाषेच्या सक्तीचा जो उपदव्याप सुरु आहें तो भाजपच्या निवडणूक एजंड्यावर आहें हे आता स्पष्ट होतं आहें,

एकीकडे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने मराठी भाषा कशी समृद्ध करता येईल व मराठी भाषा इतर राज्यामध्ये कशी शिकवता येईल याचा विचार राज्य सरकारने करायला हवा आणि ज्या अर्थी देशातील अर्ध्यापेक्षा जास्त राज्यातील लोकं महाराष्ट्रात येऊन रोजगार करतात व नोकऱ्या करतात त्यामुळे त्यांना मराठी कळावं म्हणून मराठी भाषा सक्तीची करण्याचे सोडून महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदी सक्तीची करण्यात आली आहे. या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध करत सरकारच्या शिक्षण धोरणाचे वाभाडे काढले आहें. त्यामुळे भाषेवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. बरेच जण सरकारवर टीका करत आहेत. यामध्ये केवळ सर्वसामान्यांचा समावेश नसून बऱ्याच सेलिब्रिटी मंडळींचा देखील समावेश पाहायला मिळत आहे. आतापर्यंत सचिन गोस्वामी, हेमंत ढोमे, समीर चौगुले यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी हिंदी भाषा सक्तीकरणावर निषेध केला आहे. मात्र आता प्रसिद्ध लेखक अरविंद जगताप यांनी सोशल मीडियावर जी पोस्ट शेअर केली ती मोठया प्रमाणात चर्चेत असून ती पोस्ट सरकारच्या एकूण कारभाराची खिल्ली उडवीनारी आहें,

काय म्हणताहेत चला हवा येऊ द्या मधले लेखक अरविंद जगताप.

ज्या प्रमाणे फडणवीस यांनी दुसऱ्या पक्षाचे आमदार फोडतांना त्यांचा एक गट तयार करून त्यांना बंडाखोरी करायला लावली आणि नंतर आपल्या पक्षात घेतले तशीच पद्धत त्यांनी आता शिक्षण धोरणात राबवून हिंदी- मराठी भाषिक विद्यार्थ्यांची फोडाफोडी करून हिंदी भाषिक विद्यार्थ्याचा एक गट तयार करण्याचा आणि त्यातून येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत सत्ता मिळविण्याचा डाव खेळला जात आहें, याविषयी अनेक मराठी कलावंत आपल्या प्रतिक्रिया देतं असतांना चला हवा येऊ द्या मधल्या पोस्टमन या पात्रामार्फत पाठवल्या जाणाऱ्या पत्राच्या लेखनासाठी प्रसिद्ध असणाऱ्या अरविंद जगताप यांनी एक पोस्ट टाकून प्रतिक्रिया दिली की “पहिलीतल्या वीस मुलांनी एकत्र यायचं आणि तिसरी वेगळी भाषा निवडायची. मग हे सरकार शिक्षक देणार. म्हणजे पक्ष फोडायचा अन आमदार गोळा करायचे हे मुलांनी पहिलीपासूनच शिकायचं म्हणा ना! असा टोला त्यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अमलबजावणी च्या नावाखाली महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करणाऱ्या फडणवीस यांना लगावला आहें.

मनसेची भूमिका काय?

हिंदी भाषा सक्तीकरणावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कडाडून विरोध दर्शवला. ते सतत वेगवेगळ्या भाषण आणि सोशल मीडिया पोस्ट मधून हिंदी भाषेला विरोध दर्शवत आहेत. गुजरात मध्ये सुद्धा तिसरी भाषा पर्याय म्हणून हिंदीला स्थान नाही मग महाराष्ट्रातच का असा सवाल त्यांनी उठवला आहे. दरम्यान मनसेचे कार्यकर्ते आता प्रत्येक शाळेत जाऊन पत्र देतं आहें की तुम्ही हिंदी शिकवू नका, ते पुस्तकांच्या दुकानात जात आहें की तुम्ही हिंदीची पुस्तके विकू नका अर्थात आता हिंदी विरोधात मराठी चा लढा एक अंतर्गत भाषिक युद्धाचा भाग झाल्याने सरकारचं डोकं ठिकाणावर आहें का असं म्हणण्याची वेळ आली आहे.

काय आहें सरकारचा जीआर?

काही दिवसांपूर्वी सरकारने जीआर काढले होते ज्यामध्ये राज्यातल्या सर्व शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला गेला. तसेच हिंदी भाषा व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकायची असेल तर त्यासाठी वीस पेक्षा जास्त विद्यार्थी हवेत. अन्यथा तिसरी भाषा म्हणून हिंदीच भाषा शिकावी लागेल असं त्या जीआर मध्ये स्पष्ट केलेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here