Home चंद्रपूर धक्कादायक :- राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या भद्रावती नगपरिषदवर जप्तीची...

धक्कादायक :- राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने असलेल्या भद्रावती नगपरिषदवर जप्तीची कारवाई?

तब्बल 25 वर्ष सत्ता भोगणाऱ्या सत्ताधाऱ्यांची नाचक्की, सत्ताधाऱ्यांनी नगरपरिषदचे दिवाळे काढल्याने न्यायालयातून जप्तीच्या आदेशाची नामुष्की?

भद्रावती:-

तब्बल 25 वर्षापेक्षा जास्त काळ सत्ता भोगणाऱ्या शिवसेना पक्षाच्या काळात भद्रावती नगरपरिषद ला चांगले दिवस येईल या अर्थाने येथील जनतेने नेहमीच त्यांना निवडून दिलं पण टक्क्याच्या राजकारणात कधी भद्रावती नगरपरिषद वर जप्तीची कारवाई झाली हे येतील जनतेला कळलंच नाही, मामला भद्रावती शहराच्या आठवडी बाजारासाठी भाडेतत्त्वावर दिलेल्या खासगी भूखंडाचा, तत्कालीन सत्ताधारी यांनी खाजगी जागेवर बाजार भरविण्याचा जो करार केला त्यांचे भाड्याचे पैसे सुद्धा नगरपरिषद प्रशासन आता देऊ शकतं नाही ही गंभीर बाब असून आता जवळपास ६६ लाख रुपये भाडे देण्यास भद्रावती नगर पालिकेने टाळाटाळ केल्याने अखेर वरोरा न्यायालयात प्रकरण पोहोचले आणि न्यायालयाने थेट नगर पालिका कार्यालयावर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले. न्यायालयाच्या आदेशानुसार गुंडावार यांनी आज, सोमवारी (दि.३०) नगर परिषद कार्यालयात जाऊन जप्तीची कारवाई केली. या जप्ती अंतर्गत कार्यालयातील मुख्याधिकाऱ्यांची खुर्ची, वाहन, सोफा, इतर खुर्च्या, यांसह विविध साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे भद्रावती नगरपालिकेची लक्तरे वेशीला टांगली गेली असून तत्कालीन सत्ताधारी यांची नाचक्की झाली आहें.

तत्कालीन सत्ताधारी यांच्या चुकीच्या निर्णयामुळे ज्या नगरपरिषद ला राजे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव दिले त्या वस्तूची जप्ती करण्याची वेळ आल्याने तत्कालीन सत्ताधारी यांच्या त्या भूखंड भाडयाने घेण्याच्या कराराची निंदा करण्यात येत आहें, खरं तर राज्यात ही पहिली नगरपरिषद असेल ज्या नगरपरिषद ने जागा भाडयाने घेतली असेल नाहीतर कित्तेक नगरपरिषद च्या जागा ह्या खाजगी लोकांना भाड्याने देण्यात येते, भद्रावती नगरपरिषद मध्ये जो कारभार चालला होता तो अणाठाई होता, कारण नगरपरिषद ने स्वतः जागा खरेदी करायला हवी होती तेवढे पैसे नगरपरिषद कडे तेंव्हा होते पण टक्क्याचे गणित आडवे आले आणि भाडे तत्वावर जागा भाडयाने घेण्यात आली. ज्यामुळे आता नगरपरिषद वर जप्तीची कारवाई झाली ती भद्रावती शहरातील टॅक्स भरणाऱ्या जनतेला संताप आणणारी आहें.

काय आहें जप्तीचे प्रकरण?

भद्रावती शहरातील राजु गुंडावार, संजय गुंडावार व किशोर गुंडावार यांची ३० हजार ०३३ फुट जमीन २०१८ मध्ये भाजीपाला मार्केट करिता भद्रावती नगर पालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या पुढाकाराने ६६ हजार रुपये प्रतिमहिना भाडेतत्त्वावर घेतली होती. प्रारंभी काही महिने भाडे दिल्यानंतर पालिकेने पुढील भाडे थकवले. थकीत भाडे जवळपास ६६ लाख रुपयांवर पोहोचले. या रकमेची गुंडावार यांनी नगर पालिका कार्यालयाकडे अनेकदा मागणी केली. त्यासाठी पुरेशी संधीही दिली. मात्र नगर पालिकेतर्फे थकीत रक्कम देण्यात न आल्याने गुंडावार यांनी याविरोधात वरोरा दिवानी न्यायालयात खटला दाखल केला. या खटल्याचा निकाल न्यायालयाने गुंडावार यांच्या बाजुने देत रक्कम वसुलीसाठी जप्तीचे अधिकार गुंडावर यांना दिले.

नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांचे म्हणणे काय? भूखंड मालक काय म्हणाले?

नगरपालिकेजवळ भाड्याची रक्कम चुकती करण्यास पुरेसा पैसा नाही. ही रक्कम पाच टप्प्यांमध्ये देण्याचा प्रस्ताव गुंडावार यांना देण्यात आला. मात्र त्यांनी तो मान्य न करता जप्तीची कारवाई केली, असे भद्रावती नगरपालिकेच्या मुख्याधिकारी विशाखा शेळकी यांनी सांगितले. दरम्यान जप्त करण्यात आलेल्या साहित्यांचा लिलाव करून भाड्याची रक्कम वसूल करण्यात येईल. वसुली पूर्ण न झाल्यास आणखी साहित्य जप्त करण्यात येईल, असे भूखंड मालक संजय गुंडावार यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here