भाजप कांग्रेस च्या नेत्यांचे दावे प्रतिदावे सत्ता स्थापनेनंतरचं कळणार, जसा भाजप मध्ये कलह तसा महाविकास आघाडीत पण घोडेबाजार चालणार?
चंद्रपूर :-
तब्बल १३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच आपले नवे वर्चस्व निर्माण केले तर कांग्रेस च्या सत्ताधारी यांनी पण आपले प्यादे निवडून आणून अध्यक्ष पदासाठी चूरस निर्माण केली, खरं तर बहुमत कुणालाच नाही आणि कोण कुठे जाणार याची कुणी शास्वती पण देऊ शकतं नाही, या निवडणुकीत अनेकांचे अक्षरशः बळी दिले गेले तर बैंकेच्या नोकर भरती घोटाळ्यात सामील संचालक हे निवडून येतीलच याबाबत कुणालाही शंका नव्हती कारण त्यांनी त्यात कोट्यावधी रुपये कामावले आणि त्या माध्यमातून निवडून आले, मात्र कांग्रेस समर्थित उमेदवार किती हा संशोधनाचा विषय ठरत आहें, कारण भाजप तर्फे सांगण्यात आले की आमचेकडे 11 सदस्य निवडून आले, तर कांग्रेस तर्फे सुद्धा तब्बल 14 संचालक असल्याची माहिती देण्यात आली पण खरा आकडा आणि तो पुराव्यासह द्यायला कुणी तयार नाही, मात्र दोन दिवसात खरी राजकीय परिस्थिती दिसणार असल्याचे बोलल्या जात आहें.
सिडीसीसी बैंकेच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला असल्याचा दावा भाजप तर्फे करण्यात येत असून त्या निमित्ताने माझ्या जनसंपर्क कार्यालयात सर्व ११ विजयी संचालकांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला असं आमदार किशोर जोरगेवार यांनी सामाजिक माध्यमावर सांगितलं आणि गांधी चौकात भव्य जल्लोष साजरा करण्यात आला. दुसरीकडे कांग्रेस समर्थित 14 संचालक असल्याचा दावा कांग्रेस कडून करण्यात आला आहें आणि बैंकेचा अध्यक्ष आमचाच अशी घोषणा पण करण्यात आली आहें.
कोण आहेत भाजप चे संचालक?
भाजप ने दावा केला की आमच्याकडे बहुमत आहें आणि त्यांनी आपली यादी पण जाहीर केली, त्यात संजय डोंगरे, गजानन पाथोडे, गणेश तर्वेकर, आवेश पठाण, रोहित बोंमावार, यशवंत दिघोरे. सुदर्शन निमकर, नंदाताई आल्लू्रवार, ललित मोटघरे हे नऊ संचालक आपले आहेत आणि दोन संचालक यांचा पाठिंबा आहें असे दर्शविण्यात आले.
बिनविरोध निवडून आलेले तें संचालक आणि केलेला दावा.
या निवडणुकीत आधीच १३ संचालक बिनविरोध निवडले गेले होते. यामध्ये रवींद्र शिंदे, संतोष रावत, संदीप गड्डमवार, डॉ. अनिल वाढई, संजय डोंगरे, विलास मोगरकर, उल्हास करपे, गणेश तर्वेकर, दामोदर मिसार, खासदार प्रतिभा धानोरकर, नंदा अल्लूरवार, विजय बावणे आणि आवेश खान पठाण यांचा समावेश आहे. कॉंग्रेस आणि भाजप दोघांनीही बँकेत बहुमत असल्याचा दावा करत अध्यक्षपदासाठी अंतर्गत जुळवाजुळव सुरू केली आहे. भाजप कांग्रेस च्या नेत्यांचे दावे प्रतिदावे सत्ता स्थापनेंनंतरचं कळणार, पण जसा भाजप मध्ये अंतर्गत कलह दिसणार आहें तसा कांग्रेस मध्ये पण घोडेबाजार रंगणार एवढे मात्र नक्की.