चंद्रपूर महानगर पालिका तर्फे
संपूर्ण शहरात टिल्लू पंप जप्तीची धडक मोहीम
पाणीपुरवठा विभाग कर्मचारी यांच्या वतीने कार्यवाही सुरू
राजेंद्र मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधी
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगर पालिका आयुक्तसाहेब यांचे आदेशाने तसेच सहाय्यक अभियंता संबंधित अधिकारी पाणीपुरठा विभाग यांचे मारगदर्शनाखाली टिल्लू पंप जप्तीचे आदेश असल्याने. पाणीपुरवठा सुरक्षित रहाण्याच्या उद्देशाने नळ धारकांना पूरक पाणीपुरठा होत असताना सुद्धा काही नागरिकांना पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याची तक्रार महानगर पालिका मध्ये केली जातात,परंतु काही काही वॉर्डातील डायरेक्ट नळाला पाईप लाऊन टिल्लू पंपच्या साहाय्याने पाणी भरण्याचे प्रकार संबंधित पाणीपुरवठा विभाग येथील कर्मचारी यांचे निर्दशनास आले असून ,
नळ धारकांना पूर्व सूचना देण्यात आले तरीपण सुद्धा काही नळ धारक बेजबाबदारपणे खुलेआम नळाला टिल्लू पंपचा वापर करून नियम बाह्य कृत्य करीत असल्याचे दिसून येत आहेत.
सातत्याने दि.09/07/2025 पासून मुसळधार पावसात भिजून टिल्लू पंप ची मोहीम यशस्वी रित्या पार पाडत असल्याचे दिसून येत आहेत.
बालाजी वार्ड, निंबाळकर वाडी, नगिना बाग सिस्टर कॉलनी आणि तुकुम प्रभाग मातोश्री शाळे मागील परिसरातील आणि इतर वॉर्डातील टिल्लू पंप जप्तीची मोहीम यशस्वी करण्याचे काम पाणीपुरवठा विभागातील संबंधित कर्मचारी यांचे पुढाकाराने धडक मोहीम राबविण्यात येत असून कार्यवाही करण्यात येत आहे.
अखिलेश दुपारे,खुशाल भोयर,पराग आत्राम,बंडू थेरे,चेतन भानारकर,सुभाष खडसे, कातोरे ,शुभम गौरकर,जावेद शेख, राजिक शेख,राजेंद्र मेश्राम, प्रथमेश येनुरकर,तुषार चौधरी, लोनगाडगे, इत्यादी कर्मचारी यांच्या उपस्थित धडक मोहीम राबविण्यात येत आहे.