टेंभुर्डा बैंक शाखेचे ग्राहक संतापले, हजारो कष्टकरी, शेतकरी व सामान्य ग्राहकांची गुंतवणूक असताना बैंक व्यवस्थापनाचा निर्णय चुकीचा.
वरोरा-टेंभुर्डा (धनराज बाटबरवे):-
बैंकेच्या ग्राहकांना कुठलीही पूर्व सूचना न देता बैंक ऑफ महाराष्ट्र टेंभुर्डा शाखेचे स्थलांतरण वरोरा परिसरात होत असल्याचे पत्र बैंक व्यवस्थापनाने ग्रामपंचायत टेंभुर्डा च्या फलकावर लावल्याने एकच गोंधळ उडाला असून टेंभुर्डा शाखेचे हजारो ग्राहक या निर्णयामुळे संतापले व त्यांनी बैंक शाखेत जाऊन व्यवस्थापक यांची भेट घेऊन निवेदन दिले मात्र हा निर्णय झाला आहें आणि आमच्या हातात आता काहीही उरले नाही असे म्हणत बैंक व्यवस्थापक यांनी आपले हात झटकल्याने बैंकेच्या ग्राहकांमध्ये कमालीचा आक्रोश बघावंयास मिळाला आहें. यावेळी निवेदन देतांना ग्रामपंचायतचे आजी माजी सदस्य तथा माजी ग्रामपंचायत सरपंच संगीता आगलावे यांचेसह मारोती झाडे माजी सरपंच, फकीर कोटंगले, दुर्गा आगलावे, तेजस रेड्डी, प्रतिभा नक्षीने, उज्वला नक्षीने, ज्योती ठावरी, स्वाती कडवे व महिला बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
बैंक ऑफ महाराष्ट्र ही बैंक स्थलांतरण होणार अशा आशयाचे सूचना पत्र दिनांक 5/ 7/2025 ला प्रसिद्ध झाल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र टेंभुर्डा या शाखेच्या ग्राहकांमध्ये मोठी खळबळ उडाली, अचानक बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे वरोऱ्याला स्थलांतरित होणार आहे असे सूचना पत्र लावण्यात आले होते त्यामुळे टेमुर्डा गावातील खातेधारक तसेच महिला बचत गटातील महिला, स्थानिक छोटे मोठे दुकानदार व परिसरातील कर्मचारी वर्ग यांनी बँक ऑफ महाराष्ट्राला स्थलांतर होऊ नये याबाबत बैंक व्यवस्थापकाला निवेदन देण्यात आले. या बँकेमध्ये 35 ते 40 खेड्यातील लोकांचे खाते असून दहा हजाराच्या वर खातेदारक आहे, परंतु ही बँक ग्रामपंचायत चाळीमध्ये आतापर्यंत चालू असतांना बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार या बँकेमध्ये चार ते पाच वेळा चोरी करण्याचा प्रयत्न झालेला होता यावरून ही बैंक स्थलांतरण होत असल्याची बैंकेच्या कर्मचाऱ्यानी माहिती दिली.
कोण आहेत यासाठी जबाबदार?
बैंक ऑफ महाराष्ट्र ही शाखा टेंभुर्डा ग्रामपंचायत कॉम्प्लेक्स मध्ये आहेत मात्र या बैंकेच्या किरायाचे पैसे घेणाऱ्या टेंभुर्डा ग्रामपंचायतच्या सरपंच उपसरपंच सदस्य आणि सचिवाने याबाबत कुठलीही उपाययोजना न करता व बैंकेने याबाबत पत्र दिले असतांना हा विषय ग्रामसभेत न मांडता या परिसरातील हजारो बैंकेच्या ग्राहकांना अंधारात ठेऊन फार मोठी चूक केली त्यामुळे खरंतर बैंकेचे जर स्थलांतरण झाले तर त्यासाठी ग्रामपंचायत चे सर्व पदाधिकारी यासाठी जबाबदार आहेत, कारण अगोदरचं भ्रष्टाचाराच्या विळख्यात गुंतलेल्या ग्रामपंचायत चे पदाधिकारी आणि सचिव ग्रामस्थांच्या रडारवर असतांना त्यांचेकडून एवढी मोठी चूक होत असेल तर येथील जनतेने त्यांना काय केवळ पैसे कमाविण्यासाठी निवडून दिले काय असा प्रश्न उपस्थित होत आहें.
मनसे तर्फे आज जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदन.
टेंभुर्डा गावात राजकारणं करणारे अनेक राजकीय पक्षाचे पुढारी निवडणूकीच्या वेळी एवढे सक्रिय असतात की जणू काही तेच निवडणूकीच्या रिंगणात निवडणूक लढत आहें, पण जेंव्हा स्थानिक मुद्द्यावर लढण्याची वेळ येते तेंव्हा मात्र हे सर्व राजकीय पुढारी नेमके कुठल्या बिळात एकाग्र होतात हेच कळत नाही, पण माजी सरपंच संगीता आगलावे सारख्या पदाधिकारी आणि सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते तेवढे याबाबत आवाज उचलतात त्यामुळे ज्वलंत प्रश्नावर आक्रोश निर्माण होत असतो आणि प्रश्न निकालीत निघतात, दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्थानिक कार्यकर्ते याबाबत अतिशय दक्ष असल्याने त्यांच्या माध्यमातून अनेक प्रश्न सोडविण्याबाबत पुढाकार घेतला जातो आणि आता बैंक ऑफ महाराष्ट्र शाखेचे स्थलांतरण मुद्द्याला घेऊन मनसेचे कार्यकर्ते पदाधिकारी जिल्हाधिकारी आणि बैंक ऑफ महाराष्ट्र च्या मुख्य कार्यालय व संचालकांना निवेदन देऊन स्थलांतरणावर स्थगिती आणा अन्यथा आंदोलन करू असा इशारा देणारं आहें.