उडानपुलाच्या वळणावर धोका असतांना वाहतूक नियंत्रण विभाग साखर झोपेत का?
वरोरा ( निखिल हिवरकर ):-
वरोरा शहरात प्रवेश करतांना जो उडान पूल बांधण्यात आला आहें तो अतिशय घातक असून नागपूर मार्गे शहरात व वणी मार्गाने वाहन वळती करण्यास प्रत्येक वाहणाच्या चालकांना मोठी सावधगिरी बाळगावी लागते मात्र रात्रीच्या वेळीला वाहन चालकांचे नियंत्रण सुटत असल्याने या उडान पुलावर नेहमीच अपघात घडत असतें असाच मोठा अपघात आज रात्रीच्या वेळी घडला असून एसटी बस ची एका युवकांच्या दोन चाकी गाडीला ठोस लागल्याने तो युवक जागीच ठार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून वेकोली माजरी येथे कार्यरत प्रतीक जुलमे नामक युवक जागीच ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहें. दरम्यान वरोरा पोलिसांनी एसटी बस पोलीस स्टेशन तेथे जमा करून पुढील तपास सुरु केला आहें.
वरोरा शहराला जोडणारा उडानपूल हा खऱ्या अर्थाने रेल्वे क्रांसिंग ला टाळण्यासाठी निर्माण केला गेला असला तरी तो उडानपुल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कसोटीला खरा उतरला नाही हे आता सिद्ध झाले आहें, खरं तर उडानपूल बांधकाम करतांना जें नियोजन आणि दुरदृष्टी असायला हवी ती नसल्याने हा उडानपुल जीवघेना ठरला आहें, त्यात या पुलावरून होणारी जड वाहतूक व छोट्या गाड्या यामुळे अरुंद स्वरूपाचा हा उडानपूल नेहमीच अपघाताला निमंत्रण देतं असतांना वाहतूक नियंत्रण शाखा साखरझोपेत आहें का असा प्रश्न निर्माण होत असून आज झालेला अपघात त्याचीच प्रचिती असल्याने याकडे कुठला लोकप्रतिनिधी लक्ष देणारं व होणारे अपघात टाळण्यासाठी समोर येणार हे पाहणे ऑस्तुक्याचे ठरणार आहें.