चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या सत्ता स्थापनेत अध्यक्ष बनण्यासाठीच्या शर्यतीत शिवसेनेला जय महाराष्ट्र? भाजप आमदार बंटी भांगडिया यांचा पुढाकार?
चंद्रपूर :-
चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या नोकर भरतीत कोट्यावधी रुपयांचा घोटाळा करण्यात आल्याने बैंकेवर एसआयटी चौकशी सुरु असतानाच बैंकेच्या संचालक पदाच्या निवडनुका पार पाडल्या यामध्ये भाजप समर्थित 9 उमेदवार निवडून आले, मात्र सत्ता स्थापनेसाठी किमान 11 संचालकाचे समर्थन असावे लागते, दरम्यान रवींद्र शिंदे यांच्याकडे तीन संचालक असल्याने त्यांचे समर्थन मिळाल्यास भाजप चा पहिल्यांदा अध्यक्ष बैंकेचा बनू शकतो, त्यामुळे भाजप चे तथाकथित किंगमेकर आमदार बंटी भांगडिया ज्यांचा बैंकेच्या नोकर भरतीत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग होता त्यांनी बैंकेचे माजी अध्यक्ष रवींद्र शिंदे यांना आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सोबत चर्चा घडवून आणल्याची गोपनीय सूत्रांकडून माहिती आल्याने विद्यमान उबाठा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे हें काही तासातांच भाजप मध्ये प्रवेश करून चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेचे अध्यक्ष पदाचे दावेदार असतील अशी माहिती समोर आल्याने चंद्रपूर च्या राजकीय गोटात मोठी खळबळ उडाली आहें.
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांचा सहकार क्षेत्रात मोठा दबदबा आहें आणि त्यांनी सहकार क्षेत्रात आपली मजबूत पकड करून तत्कालीन खासदार स्वर्गीय बाळू धानोरकर यांना सहकार क्षेत्रात पाय रोवू दिले नाही आणि दोन्ही बाजार समित्या जिंकल्या त्यामुळे रवींद्र शिंदे यांची सहकार क्षेत्रात ताकत बघता त्यांना भाजप मध्ये आणण्यास भाजप आमदार बंटी भांगडिया आतुर होते आता त्यावर शिक्कामोर्तब होईल अशी चर्चा असून शिवसेना उबाठा गटाला जय महाराष्ट्र करून रवींद्र शिंदे लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहें, दरम्यान बैकेत भाजप चा अध्यक्ष म्हणून रवींद्र शिंदे तर उपाध्यक्ष म्हणून चिमूर चे डोंगरे यांची वर्णी लागेल अशी पण चर्चा आहें.