सत्तेची चाटुकारिता कारण्यापेक्षा जनतेच्या वीज दरवाढीचा विषय घेऊन सप्ताह करा नां?
लक्षवेधी:-
चंद्रपूर च्या जनतेला 200 युनिट वीज मोफत मिळवून देऊ अशी मोदींच्या जुमल्या सारखी जुमलेबाजी करून जनतेला किशोर जोरगेवार यांनी भुरळ पाडली आणि सन 2019 ची निवडणूक अपक्ष उमेदवार असतांना तब्बल 72 हजारापेक्षा जास्त फरकाने जिंकली, कारण जनतेला वाटलं की हें आमदार झाल्यावर वीज बिलाचा विषय हाताळून विधानसभेत आमचा आवाज पोहचवतील मात्र त्यांचं धोरणचं मुळात स्वार्थी निघालं, निवडून आल्यानंतर सत्तेसाठी अगोदर त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनणार म्हणून त्यांना पाठिंब्याचे पत्र दिलं, मात्र शिवसेनेने आपली भाजप सोबत युती तोडून महाविकास आघाडी स्थापन करून कांग्रेस राष्ट्रवादी पक्ष मिळून सत्ता निर्माण केली, त्यावेळी हेच आमदार किशोर जोरगेवार मुख्यमंत्री आता उद्धव ठाकरे बनणार म्हणून त्यांना पाठिंब्याचे पत्र दिले, आश्चर्यांची बाव म्हणजे 2022 मध्ये शिवसेनेत बंड झालं आणि एकनाथ शिंदे सुरत व्हाया गुवाहाटी गेले त्यात सुद्धा बंडखोर शिवसेना आमदारासोबत किशोर जोरगेवार जणू त्यांचं हिंदुत्व सुद्धा धोक्यात आल्याने तें गेले आणि पन्नास खोके एकदम ओके हें बिरूद स्वतःला लावून घेतलं, आजही तो ट्रॅव्हल्स मधला सुरत मार्गे गुवाहाटी चा व्हिडीओ सामाजिक माध्यमावर आहें, असे हें दलबदलू आमदार स्वतःच्याi फायद्यासाठी कधी काय करेल याचा नेम नाही, मात्र आज ज्या पद्धतीने तें मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चापलुसी करण्याकरिता त्यांच्या वाढदिवसानिमित्य “देवाभाऊ सेवा सप्ताह.” राबवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्याचा प्रयत्न करताहेत, त्याबद्दल जनतेत रोष असून जर किशोर जोरगेवार यांना जनतेची सेवाच करायची असेल तर त्यांनी जनतेला जें 200 युनिट वीज मोफत देण्याचं आश्वासन दिलं तें मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून पूर्ण करावं ही जनतेची अपेक्षा आहें. देवाभाऊ सेवा सप्ताहाचं हें नाटक करून जनतेच्या पदरी काहीही पडणार नसेल तर जनता मात्र भाजप ला येणाऱ्या महानगपालिका निवडणुकीत लोळवल्याशिवाय राहणार नाही अशी राजकीय स्थिती दिसत आहें.
चंद्रपूर चे आमदार किशोर जोरगेवार यांचं राजकीय गणित अजूनही ब्रहदेवाला सुद्धा समजलं नसेल, कारण ज्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांचा हात पकडून व भाऊ भाऊ म्हणत मागे मागे फिरून आमदार पदाची लायकी मिळवली तें जोरगेवार आमदार झाल्यानंतर मात्र त्याच गुरुतुल्य व्यक्तीचा सत्तेसाठी विरोध करत आहें, असं म्हटल्या जातं की धनावर नाग ठेवला की तो मालकाला सुद्धा चावतो तशीच स्थिती आमदार किशोर जोरगेवार यांची आहें, एक छोटासा मंडप डेकोरेशन चा व्यवसाय ज्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मदतीने उभा राहिला त्यानंतर प्रापर्टीच्या धंद्यात त्यांचेच पैसे लावून स्वतःच्या प्रापर्ट्या कमावल्या आणि कोट्यावधी चा धंदा केला, किशोर जोरगेवार यांना भाजप ने उमेदवारी द्यावी म्हणून मुनगंटीवार यांनी भाजप चे मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेली धमकी पचवली आणि त्यानंतर सुद्धा किशोर जोरगेवार यांना अप्रत्यक्षपणे मदत केली त्यामुळेच आज किशोर जोरगेवार आमदार आहेत, पण सत्तेची नशा एवढी वाईट असतें की ती डोक्यात गेली की स्वतःच्या गुरूला सुद्धा लोकं विसरतात त्यात किशोर जोरगेवार यांचा अग्रक्रम लागतो.
देवाभाऊ सेवा सप्ताहाचं नाटकं कशासाठी?
राज्याची सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहें, तें जें म्हणेल तेच खरं असं राजकीय वातावरण आहें आणि ज्या माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात काम करणारे फडणवीस आता स्वतः मुख्यमंत्री झाले त्यांनी चं मुनगंटीवार यांना मंत्रीपदापासून वंचित ठेऊन त्यांच्या विरोधात चंद्रपूर मध्ये आमदार बंटी भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, डॉ. अशोक जिवतोडे यांना बळ दिल्याने येणाऱ्या काळात आपल्याला मंत्रिपद मिळावं यासाठी दोनही आमदारांची चापलुसी सुरु असून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या निवडणुकीत सुद्धा यांनी दाखवलेला पुढाकार तेच दर्शवत आहें, आमदार बंटी भांगडिया यांनी बैंकेत सत्ता निर्माण केली तर आपण काय दाखवायचं तर आपण देवाभाऊ सेवा सप्ताहाचं नाटकं करायचं आणि मी आपल्याकरिता काहीही करू शकतो हें दाखवायचं असा जणू हा प्रकार दिसत आहें. मात्र सत्तेची चाटुकारिता कारण्यापेक्षा जनतेच्या वीज दरवाढीचा विषय घेऊन सप्ताह करा असा सल्ला सामाजिक कार्यकर्ते देतं आहें.