Home वरोरा वरोरा शहरात परप्रांतीयांच्या अवैधरित्या मटण विक्री विरोधात स्थानिक खाटीक समाज संघटना आक्रमक.

वरोरा शहरात परप्रांतीयांच्या अवैधरित्या मटण विक्री विरोधात स्थानिक खाटीक समाज संघटना आक्रमक.

परप्रांतीय मटण विक्रेत्या विरोधात खाटीक समाज संघटने सोबत मनसे करणार खळखट्याक आंदोलन

वरोरा प्रतिनिधी:-

वरोरा शहरात जुन्या मटण मार्केट मध्ये जें नोंदणीकृत खाटीक समाजाचे दुकानदार आहेत तें व्यवसाय करतात पण आता या धंद्यात मोठया प्रमाणात परप्रांतीय खाटीक घुसल्याने स्थानिक मराठी खाटीक समाजाच्या मटण विक्रीच्या धंद्यावर मोठे संकट ओढवळे असल्याने वरोरा येथील बहुउद्देशीय खाटीक समाज संस्थे द्वारा संचालित खाटीक समाज संघटनेचे अध्यक्ष काळुमामा उर्फ पुंडलिक कटारे, सचिव सागर पारवे, कोषाध्यक्ष चंद्रकांत हिकरे यांनी पुढाकार घेऊन परप्रांतीयानी वरोरा शहरातील बोर्डा चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती व माढेळी नाका येथे बेकायदेशीर मटण दुकानं थाटल्याने त्या विरोधात जिल्हाधिकारी, नगरपरिषद वरोरा मुख्याधिकारी, स्थानिक पशुसंवर्धन अधिकारी व पोलीस निरीक्षक यांना निवेदने देऊन परप्रांतीयांचे मटण विक्रीचे दुकानं तात्काळ गावातून उठवा अन्यथा खाटीक समाज संघटना नगरपरिषद च्या भ्रष्ट कारभाराविरोधात मोठे आंदोलन करेल असा इशारा प्रशासनाला दिला आहें, दरम्यान मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांना सुद्धा या संदर्भात निवेदन दिल्याने परप्रांतीय मटण विक्रेत्या विरोधात मनसे कडून सुद्धा खळखट्याक आंदोलन करण्यात येईल असा इशारा राजू कुकडे यांनी प्रशासनाला दिल्याने आता नगरपरिषद प्रशासनाने लवकर कारवाई होईल अशी अपेक्षा आहें.

शहरातील नगरपरिषद मध्ये सध्या प्रशासक असून मुख्याधिकारी सुद्धा इथे नियमित कार्यरत नाही, येथील आरोग्य व्यवस्थाचं जणू व्हेंटिलेटरवर असून शहरातील आरोग्याच्या दृष्टीने कुठलेही ठोस काम नाही अशातच बाहेर प्रांतातील लोकं येऊन इथे मटण विक्रीचे दुकानं रस्त्याच्या कडेला थाटून वेस्टेज मटेरियल उघड्यावर टाकत असल्याने त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरून परिसरातील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

परप्रांतीयांनी केवळ एकच मटण विक्रीचे दुकानं थाटले नाही तर तब्बल 5 दुकाने थाटले आहें आणि पुन्हा 15 दुकाने सुरु करण्याच्या तें तयारीत असून निकृष्ट दर्जाचे मटण कमी दरात विकून तें स्थानिक मराठी खाटीक समाजाच्या परंपरागत मटण विक्रीच्या धंद्यावर परिणाम करत असल्याने आता खाटीक समाज संघटना रस्त्यावर उतरून परप्रांतीय मटण विक्रीचे दुकान नगरपरिषदने बंद पाडले नाही तर स्वतः बंद पाडेल असा इशारा देण्यात आला आला आहें, दरम्यान या आंदोलनात मनसे पदाधिकारी उतरल्यास मोठा हंगामा होईल त्यामुळे आता नगरपरिषद प्रशासन या संदर्भात काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहें.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here