शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने उबाठा मध्ये सुरु असलेली जिल्हाप्रमुख पदासाठी चढाओढ अंतिम टप्प्यात.
भद्रावती :-
शिवसेना हा पक्ष बाळासाहेबांचा विचाराने चालनाणारा पक्ष असला तरी विद्यमान स्थितीत तो बहुआयामी असा सत्तेसाठी लवचीक झाला आहे, मात्र काही कट्टर शिवसैनिक आजही बाळासाहेबांच्या विचारांनी चालणारे आहेत आणि कोणी कितीही शिवसेना सोडून गेले तरी शिवसेनेशी एकनिष्ठ राहणारे मावळे आजही चंद्रपूर जिल्ह्यात आहें, असाच एक कट्टर शिवसैनिक मावळा सुयोग भोयर जो लहानपणापासून बाळासाहेबांचे तें कट्टर हिंदुत्व जोपासून व ज्वलंत विचार आत्मसात करून शिवसेनेशी प्रामाणिक आहें, आता शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंकेच्या अध्यक्ष पदासाठी भाजप मध्ये उडी घेतल्यानंतर रिक्त झालेल्या शिवसेना जिहा प्रमुख पदी शांत संयमी पण प्रसंगी आक्रमक अशा सुयोग भोयर यांची वर्णी लागावी यासाठी जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक त्यांना पाठिंबा देतं आहें, त्यामुळे त्यांचा पक्षाप्रती प्रामाणिकपणा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वरिष्ठ नेते त्यांच्या गळ्यात शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची माळ घालणार असल्याची दाट शक्यता आहें.
रवींद्र शिंदे यांच्या भाजप प्रवेशाने शिवसैनिक आक्रमक.
वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची धुरा सांभाळणारे रवींद्र शिंदे यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते, वरोरा भद्रावती शहरात शिवसेना जिल्हा प्रमुख पद विकणे आहें अशाअशयाचे बैनर झळकले होते, एवढेच नव्हे तर रवींद्र शिंदे यांच्या वरोरा शहराच्या कार्यालयात असलेल्या बैनर च्या फोटोवर काळ फासून निषेध व्यक्त केला आहें, सध्या या विधानसभा क्षेत्रात शिवसैनिक आक्रमक झाले असतांना जिल्हाप्रमुख पदाचे अनेक दावेदार आहेत पण जनतेला भुरळ पाडेल असे नेतृत्व शिवसेनेत तयार होईल त्या अर्थाने सुयोग भोयर यांच्या नावाला पहिली पसंती मिळू शकते.
एकेकाळी वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची मोठी ताकत होती, भद्रावती नगरपरिषद मध्ये तर 1996 पासून शिवसेनेची सत्ता होती, मात्र ज्यांना भद्रावतीकरांनी बाळासाहेबांच्या नावाने मोठं केलं तें सर्व शिवसेनेला सोडून गेले, त्यात माजी आमदार जनार्धन साळुंके, सुनील नमोजावार, स्वर्गीय बाळू धानोरकार आणि आता रवींद्र शिंदे यांनी शिवसेनेचा फायदा घेतला पण शिवसेना जोपसली नाही आज त्या प्रचंड ऊर्जा असलेल्या शिवसेनेला अखेरची घरघर लागली असून शिवसेनेला पुन्हा या वरोरा भद्रावती विधनसभेत आपले पायेमुळे भक्कम करायचे असेल तर सुयोग भोयर सारख्या कट्टर शिवसैनिकाला जिल्हाप्रमुख पदावर आरूढ करावं लागेल नाहीतर पुनः तेच अखेरची घरघर सुरु राहिलं असं राजकीय वातावरण आहें l.