Home चंद्रपूर ब्रेकिंग:- अनुप यादव यांच्या तक्रारीवरून एमआयडीसीच्या हरियाणा पेपर बोर्ड कं परिसरातील रेती...

ब्रेकिंग:- अनुप यादव यांच्या तक्रारीवरून एमआयडीसीच्या हरियाणा पेपर बोर्ड कं परिसरातील रेती जप्त होणार?

जिल्हाधिकारी यांची परवानगी घेतल्याचा बनाव करून शेकडो ब्रास रेतीचा साठा करणाऱ्या भावेश पटेल यांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळं अभियंत्याची नोटिस.

चंद्रपूर:-

जिल्ह्यातील सर्व रेती घाट बंद झाले असून आता रेती घाटातून साठवलेला रेती साठा उचलण्यात येत आहे, मात्र ज्या ठिकाणी रेती साठा करायचा होता ती जागा स्थानिक तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत एन.ए. करावे लागत असतांना स्थानिक नवीन चंद्रपूर एमआयडीसी मधील हरियाणा पेपर बोर्ड कंपनी परिसरातील साठवलेला जवळपास 200 ते 250 ब्रास रेती साठा बेकायदेशीर असल्याने याबाबत अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अनुप यादव यांनी रेती साठा करणाऱ्या हरियाणा पेपर बोर्ड कंपनी चे संचालक यांचेशी विचारना केली असता त्यांनी मला जिल्हाधिकारी यांनी रेती साठा करण्याची परवानगी दिल्याची माहिती दिली, परंतु ज्या एमआयडीसी परिसरात रेतीचा साठा केला गेला तो महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळं चंद्रपूर यांच्या पूर्व परवानगी शिवाय होऊ शकतं नाही त्यामुळे त्यांचेकडे अनुप यादव यांनी तक्रार करून कारवाई करण्याची मागणी केली असता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळं चंद्रपूर यांनी संबंधित रेती साठा करणाऱ्या हरियाणा पेपर बोर्ड संचालकाला पत्र देऊन रेती साठा त्वरित उचलण्याचा आदेश केल्याने आता अनुप यादव यांच्या तक्रारीवरून एमआयडीसीच्या हरियाणा पेपर बोर्ड कंपनी परिसरातील रेती जप्त होणार असल्याचे संकेत मिळतं आहे..

स्थानिक नवीन चंद्रपूर एमआयडीसी परिसरातील भूखंड क्र.बी-१५, १६ चंद्रपुर औद्योगिक क्षेत्र परिसरात भूखंड क्र. बी-१६ वरील अवैध रेती साठा असल्याची माहिती मिळताच पत्रकार म्हणून अनुप यादव यांनी याबाबत हरियाणा पेपर बोर्ड कंपनी चे संचालक यांना विचारणा केली की या रेती साठ्याची परवानगी आपण काढली का? त्यावर भावेश पटेल नामक कंपनीचे मालक यांनी म्हटले की हा रेती साठा जिल्हाधिकारी यांच्या मंजुरी ने केलेला आहे. त्यामुळे अनुपम बहुउद्देशीय सामाजिक संस्थाके अध्यक्ष अनुप यादव यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळं चंद्रपूर यांचेकडे तक्रार केली, त्या तक्रारीवरून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळं चंद्रपूरचे उपअभियंता एस एस पराते यांनी रेती च्या या अवैध रेती साठ्या संदर्भात प्रत्यक्ष पाहणी करून हरियाणा पेपर बोर्ड कंपनी च्या भावेश पटेल यांना नोटीस दिला की आपण तात्काळ रेतीचा अवैध रेती साठा उचलावा किंव्हा त्या रेती साठ्या संदर्भात आपल्याकडे काही मंजुरीचे पत्र असेल तर ते सादर करावे अन्यथा आपल्यावर कारवाई करण्यात येईल, दरम्यान महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळं चंद्रपूर परिसरात साठवलेली रेती ही त्यांच्या परवानगी शिवाय साठवू शकतं नाही आणि तशी मंजुरी बिना प्रोजेक्ट बांधकाम कुणी देऊ शकतं नाही त्यामुळे आता जवळपास 200 ते 250 ब्रास रेती साठा जो भावेश पटेल यांनी बेकायदेशीपणे साठावला त्यावर दंडात्मक व फौजदारी करावाई होऊ शकते अशी शक्यता आहे, दरम्यान याबाबत स्थानिक जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना अगोदरचं तक्रारी करण्यात आल्याने आता तो संपूर्ण रेती साठा जप्त होण्याच्या मार्गांवर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here