Home वरोरा कौतुकास्पद :- अनेक वर्षानंतर सालोरी गावात अण्णाभाऊ साठे जयंती समारोह.

कौतुकास्पद :- अनेक वर्षानंतर सालोरी गावात अण्णाभाऊ साठे जयंती समारोह.

सालोरी गावातील तत्कालीन उच्च शिक्षित सुरेश डोंगरे यांनी सुरु केली 1992 साली अण्णाभाऊ साठे जयंती….

वरोरा (संदीप मोरे):-

वरोरा तालुक्यातील सालोरी या गावात अण्णाभाऊ साठे यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली, सालोरी गावातील त्या काळात पदवी शिक्षण घेतलेले सुरेश डोंगरे यांनी 1992 मध्ये पहिली अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव सुरु केला परंतु काही वर्षात त्यांची प्रकृती खालावली आणि अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रम बंद कारण्यात आला परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरोरा तालुका सरचिटणीस संदीप मोरे यांनी पुढाकार घेऊन व समाजातील सुशिक्षित असलेल्या अर्चना गायकवाड यांनी कार्यक्रमाचं नियोजन करून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं, यावेळी अण्णाभाऊ साठे यांची जयंती पहिल्यांदा सालोरी गावात सुरु करणारे सुरेश डोंगरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या अण्णाभाऊ साठे जयंती निमित्य कार्यक्रमाचे अध्यक्ष मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी आपल्या भाषणात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे विचार खूप महत्त प्रेरणादायी आहे असे म्हटले, ते पुढे म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांनी समाजातील गरीब, दलित आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांच्या विचारांमध्ये समता, न्याय, आणि शोषणाविरुद्ध लढा यावर जोर देण्यात आला आहे. त्यांनी समाजातील गरीब आणि वंचितांवरील अन्याय आणि शोषणाविरुद्ध आवाज उठवला. लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि त्यांना त्यांच्या हक्कांसाठी लढण्यासाठी प्रेरित केले, त्यामुळे आपल्या गावात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जें तैलचित्र आहे त्या जागी आपण पुतळा उभारू जेणेकरून या गावातील युवकांना साठे यांच्या विचाराची आठवण होईल आणि समाजाच्या हक्क अधिकारासाठी त्यांना लढण्यास बळ मिळेल..

अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी थोडक्यात..

अण्णाभाऊ साठे यांना जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. पण ते खचले नाहीत. नैराश्य हे तलवारीवर साठलेल्या धुळीसारखे असते. शाळा न शिकताही त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी केली. त्यांनी कादंबऱ्या, कथासंग्रह, पोवाडे, पटकथा, लावणी यांची निर्मिती केली. त्यांची ‘मुंबईची लावणी’ व ‘माझी मैना गावावर राहिली’ या लावण्या अविस्मरणीय आहेत. रशियात जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे ते प्रथम लोकशाहीर होते. ‘जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मज भीमराव’ हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले. ‘फकीरा’ या त्यांच्या कादंबरीला राज्य सरकारकडून सर्वोत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला.

कार्यक्रमाचं यशस्वी नियोजन…

उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्यां व उपस्थीत मंडळी च्यां हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या फोटोच अनावरण करून इतर महापुरुषांच्या प्रतिमेच पुजन करण्यात आल. पाहुण्यांच्या स्वागतानंतर गावातील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. तकार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मनसे उपजिल्हा अध्यक्ष राजू कूकडे यांनी भूषविले. तसेच प्रमुख अतिथी म्हणून गजानन भाऊ देहारी, महेश भाऊ म न से वाहतूक अध्यक्ष, ग्रा. प सालोरी उप सरपंच गजानन भाऊ देहारी, अनुप भाऊ यादव जेष्ठ पत्रकार, हरेंद्र भाऊ गोळेकर, सुनील भाऊ बावणे, शुभम भाऊ मगरे गौतम भाऊ ढोके, गणेश तुमसरे ही प्रमुख अतिथी उपस्थित होती. या कार्यक्रमाच्या सूत्र संचालनाची धूरा सामाजिक कार्यकर्ते संदीप भाऊ मोरे यांनी सांभाळली तर प्रास्ताविक अर्चना ताई गायकवाड यांनी केले व शेवटी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डोंगरे परिवारातील धनश्री डोंगरे या कुमारीने केले. अशा प्रकारे सालोरी गावामधे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here