https://www.facebook.com/share/v/1C541jECYy/
मनसेची शिक्षण मंत्री यासंह एसआयटी प्रमुख पोलीस उपायुक्त नित्यानंद झा यांच्याकडे मागणी.
चंद्रपूर :-
नागपूर सह महाराष्ट्रात बोगस शिक्षक शिक्षकेत्तर नोकर भरती घोटाळा झाला उघडकीस आला असून आतापर्यंत जवळपास २५ शिक्षण क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी यासह शिक्षण संस्थांचे संचालक तथा मुख्याध्यापक शिक्षक यांना पोलिसांनी अटक केलेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे सचिव तथा माजी प्राचार्य डॉ. अशोक जिवतोडे यांनी त्यांच्या संस्थेच्या जिल्ह्यातील विविध प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय येथे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि प्राध्यापक यांची भरती नियमबाह्य घेतलेली आहे. त्यापैकी काहींची यादी मनसे पदाधिकारी यांच्याकडे मिळालेली आहे. या शिक्षण संस्थेचे जाळे चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ तथा नागपूर येथे असून स्थानिक चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशी असणारे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड हे नागपूरला पदस्थ असताना स्थानिक शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून कुठलाही प्रस्ताव तयार न करता ऑनलाइन शालार्थ आयडी काढून 100 पेक्षा अधिक शिक्षक शिक्षतेत्तर व प्राध्यापक याना नोकरी देण्यात आल्याची खळबळजनक माहिती आता समोर आली असून तब्बल 22 बोगस शिक्षकांची ओळख पटली आहे तर इतरांचा शोध सुरु आहे, दरम्यान चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या व्यतिरिक्त मूल सावली आणि गडचांदूर परिसरातील संस्थेत सुद्धा बोगस शिक्षक भरती घोटाळा झाला असल्याने चंद्रपूर च्या त्या सर्व बोगस शिक्षक भरती घोटाळ्यातील संस्था चालकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे तथा एसआयटी प्रमुख नित्यानंद झा यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे..यावेळी मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत जिल्हाध्यक्ष सुनील गुढे, जिल्हा सचिव गुरुदेव मोगरे, किशोर दास इत्यादीची उपस्थिती होती.
चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ अशोक जीवतोडे यांनी आपल्या संस्थेत शिक्षण अधिकारी यांच्या माध्यमातून नियम अटी व बिंदू नामावलीचा भंग करून शिक्षक शिक्षकेत्तर प्राध्यापक इत्यादींची बेकायदेशीर भरती करून शासनाला १०० कोटीपेक्षा जास्तीचा चुना लावल्याने या प्रकरणाचो एसआयटी चौकशी करावी अशी मागणी यांचं संस्थेत सेवानिवृत्त मुख्याध्यापक राहिलेल्या गोपालराव सातपुते यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पुराव्यानीशी केली होती, मात्र सत्ताधारी पक्षात असलेल्या डॉ जीवतोडे यांना या शिक्षक भरती घोटाळ्यातून बाहेर काढण्याचा प्रकार दिसत असून मे २०२४ ला शासनाकडे प्रशासनाकडे केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने कुठलीही चौकशी झालेली नाही याचा अर्थ भाजप सरकार या बोगस शिक्षक भरती व बनावट शालार्थ आयडी प्रकरणी संस्थाचालकांना वाचवून केवळ अधिकारी कर्मचारी शिक्षक यांच्यावरच कारवाई करण्याच्या बेतात असल्याचे दिसून येते.
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल व सावली या तालुक्यातील शैक्षणिक संस्थेत बोगस शिक्षक भरती तत्कालीन शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांच्या माध्यमातून व शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या कार्यालयातून झाल्याचा आरोप सिद्धार्थ रामटेके यांनी शिक्षण उपसंचालक याना दिलेल्या निवेदनातून केला होता. दरम्यान कोरपणा तालुक्यात सुद्धा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळा द्वारे संचालित प्रभू रामचंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा संस्थेचे सचिव मुसळे यांनी योगिता चरणदास शेडमाके या महिलेची बोगस शालार्थ आयडी बनवून तिला सहाय्यक शिक्षिका म्हणून विद्यालयात रुजू करून घेतले होते. मात्र याचे बिंग फुटले आणि चौकशी अंती कोरपणा पंचायत समिती गट शिक्षणधिकारी सचिन कुमार मालवी यांच्या तक्रारी बरून संस्थेचे सचिव मुसळे व सहाय्यक शिक्षिका योगिता शेडमाके यांच्यावर ३ ऑक्टोंबर २०२३ ला गडचांदूर पोलीस स्टेशन मधे गुन्हे दाखल करण्यात आले होते, यावरूनचंद्रपूर जिल्ह्यात स्थानिक शिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून बोगस शिक्षक शिक्षकेत्तर व प्राध्यापक नोकर भरती केल्या गेली हे स्पष्ट होत आहे.
असातच चांदा शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे संचालित चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास 15 पेक्षा जास्त शैक्षणिक शाळा कनिष्ठ महाविद्यालयात येथ बोगस शिक्षक शिक्षकेत्तर, प्राध्यापक यांची नियुक्ती केल्या गेली हे आता जवळपास स्पष्ट होत असून जर चांदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या सर्व शैक्षणिक संस्थांची एसआयटी चौकशी केल्यास जवळपास १०० च्या वर बोगस शिक्षक शिक्षकेत्तर प्राध्यापक भरती झाल्याची माहिती उघड होईल.
चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर च्या माध्यमातून जनता महाविद्यालय सह एकूण 15 शाळा महाविद्यालय घालवल्या जातात त्या शाळा महाविद्यालयात जवळपास दीड ते दोन हजार शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी काम करतात, मात्र संस्थेचे सचिव डॉ अशोक जीवतोडे हे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावर दडपशाही करून व प्रसंगी त्यांना स्वेच्छानिवृत्ती करायला लावून बेकायदेशीर शिक्षक भरती करताहेत व शासनाची कोट्यावधी रुपयांनी फसवणूक करीत आहे, याविषयीची सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोपाळ सातपुते यांनी तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावाडे यांच्याकडे पुराव्यासह तक्रार केली होती, परंतु त्यावर कुठलीही चोकशी करण्यात आली नाही, दरम्यान गोपाळ सातपुते यांच्या तक्रारीची दखल घेऊन आमदार विलग बडेट्टीवार, आमदार सुनील केदार व आमदार अमर काळे यांनी विधानसभा सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित करून चांदा शिक्षण प्रसारक मंडळ सचिव यांच्या बेकायदेशीर शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेत्तर भरतीची चौकशी ची मागणी केली होती, त्यावर चौकशी समिती नेमली मात्र कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. आता त्यानंतर राज्यात सुरू असलेल्या बोगस शालार्थ आयडी व शिक्षक भरती घोटाळा उघड झाला असताना व या प्रकरणाची एसआयटी चौकशी सुरू असताना चंद्रपूर जिल्ह्यातील योगस शिक्षक शिक्षकेतर प्राध्यापक भरती घोटाळयाची चौकशी होणे अपेक्षित आहे, त्यामुळे आपण आपल्या स्तरावर त्वरित चौकशी करून एसआयटी चौकशी अधिकारी यांच्याकडे ही बाब सादर करावी व चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ अशोक जीवतोडे यांच्यावर गुन्हे दाखल करावे अन्यया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनसे स्टाईल करेल असा इशारा शिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला