समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्स च्या येण्याने अचानकबस चे स्टेरिंग वळवताना ब्लॉक झाल्याने नियंत्रण सुटले व बस दहा फूट खाली कोसळली….
वरोरा प्रतिनिधी(धनराज बाटबरवे) :-
आज चिमूरहून चंद्रपूरला जाणारी राज्य परिवहन महामंडळाची चिमूर चंद्रपूर ही बस 5 ऑगस्ट रोज मंगळवारला दुपारी दोनच्या सुमारास रस्त्याच्या खाली घसरल्याने बसमधील वाहक सुरेश भटारकर यांचा जागीच मृत्यू झाला तर सहा ते सात प्रवाशी गंभीर जखमी झाले आणि बारा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे. ही घटना चंद्रपूर वरोरा राष्ट्रीय महामार्गावर चारगाव खुर्द समोरील एका वळणावर घडली.
याबाबत मिळालेल्या वृत्तानुसार चिमूर आगाराची बस क्रमांक एम एच ४० ए क्यू ६१८१ ही चिमूर वरून चंद्रपूरला जात होती. चारगाव खुर्द या गावासमोरील एका वळणावर समोरून भरधाव आलेल्या ट्रॅव्हल्स मुळे बसचा चालक सुनील सुधाकर कुसनाके वय 37 राहणार वरोरा यांनी अचानक समोर आलेल्या ट्रॅव्हल्सच्या गतीने गोंधळून जाऊन स्टेरिंग फिरवले मात्र त्या दरम्यान ते स्टेरिंग लॉक झाल्याने बस वरील नियंत्रण सुटले व बस रस्त्याच्या खाली घसरली अशी माहिती बसच्या चालकाने दिली. या बस मध्ये जवळपास 25 प्रवासी असल्याचे समजते. यापैकी चालकासह बसमधील 19 प्रवासी जखमी झाले असून जखमींना रुग्णवाहिकेतून वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर काहींना चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे. दरम्यान काही राजकीय व्यक्तींनी इथेही राजकारणं करत ड्राइवर वर दोष दिला आहे मात्र पोलीस तपासात काय होते त्यावर सगळं अवलंबून आहे आणि ड्राइवर स्वतः जखमी असल्याने अशा दुःखाच्या वेळेस प्रसारमाध्यमाना प्रतिक्रिया देतांना सावधागिरी बाळगणे उचित ठरेल.
बस मधील जखमी पैकी शकील शेख आडेगाव, शाहीन शेख राहणार गडचांदूर, वासुदेव शेडमाके राहणार वायगाव भोयर, वसंता देठे बल्लारशा, ईश्वर चिंचोळकर राहणार धामणी संजय कोवे राहणार घुग्गुस या सहा गंभीर प्रवाशांना चंद्रपूर येथील सार्वजनिक रुग्णालय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
रेखा श्रीरामे राहणार चंद्रपूर, सुमन बालूदे लोधीखेडा, कांताबाई नवले भिसी, शामकला दडमल सुमठाणा, भरत चिंचोळकर चिमूर, वनिता दडमल चिमूर, मधुकर चिंचोलकर चिमूर, मालती कापसे चिमूर, सोमाबाई चिंचोलकर धामणी, स्नेहा वाजुरकर इंदिरानगर चंद्रपूर, सदाशिव मून बल्लारशा या जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याचे वृत्त कळतच राज्य परिवहन महामंडळाच्या वरोडा आगाराचे आगर प्रमुख वर्धेकर हे घटनास्थळी पोहोचले असून घटनेचा पंचनामा करीत आहे. अपघात झाल्यानंतर बसचा चालक स्वतःहून शेगाव येथील पोलीस स्टेशन मध्ये पोहोचला व त्यांनी घटनेची तक्रार पोलीस स्टेशनला नोंदविली. शेगाव पोलीस घटनेचा तपास करीत आहे.