Home Breaking News आ. सुधीर मुनगंटीवार यांचा धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी दुसऱ्या टप्प्यातील...

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी दुसऱ्या टप्प्यातील १३४ कोटींचा धान बोनस चंद्रपूरच्या पणन अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा यशस्वी
दुसऱ्या टप्प्यातील १३४ कोटींचा धान बोनस चंद्रपूरच्या पणन अधिकारी कार्यालयाकडे प्राप्त
धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील बोनस लवकरच जमा होणार
मुख्यमंत्र्यांकडे तसेच विधानसभेत शेतकरी हितासाठी केलेल्या प्रभावी पाठपुराव्याबद्दल आ. मुनगंटीवार यांचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मानले आभार

चंद्रपूर :-  शेतकरी हितासाठी सदैव सक्रिय असलेले राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात दुसऱ्या टप्प्यातील बोनस रक्कम लवकरच जमा होणार आहे. यापूर्वी शासनाकडून प्राप्त झालेली पहिल्या टप्प्यातील ६९ कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असून, आता १३४ कोटी २ लक्ष ५४ हजार ६३६ रुपयांची रक्कम चंद्रपूर जिल्ह्याच्या पणन अधिकारी विभागाकडे जमा झाली आहे. ही रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.

News reporter :- अतुल दिघाडे

खरीप हंगाम २०२४–२५ अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेत सहभागी झालेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना प्रती हेक्टर २० हजार रुपयांचा बोनस मिळावा, अशी मागणी आमदार मुनगंटीवार यांनी विधानसभेत व मुख्यमंत्र्यांसमोर सातत्याने लावून धरली होती. ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर शासनाने निर्णय घेत अन्न व नागरी पुरवठा विभागाने २५ मार्च रोजी अधिकृत शासन निर्णय जाहीर केला होता.

विशेष बाब म्हणजे शेतकऱ्यांनी धान विक्री केली नसेल तरीही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत ही प्रोत्साहनपर रक्कम देण्यात येणार आहे, असा ठोस निर्णयही आ. मुनगंटीवार यांच्या मागणीवरून घेण्यात आला होता. या निर्णयामुळे जिल्ह्याच नव्हे, तर राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आणि सभागृहात शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे आमदार श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून याआधीही चंद्रपूर जिल्ह्यातील २०२ कोटी रुपयांची पीक विमा रक्कम आणि बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या मिळाली आहे. त्यांच्या संवेदनशील नेतृत्वाची ही सातत्यपूर्ण फलश्रुती शेतकरी हितासाठी निर्णायक ठरली आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच बोनस जमा होणार असून, या निर्णयाबद्दल चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here