कालच प्रकल्पग्रतांच्या आंदोलनाला मनसे कामगार सेनेतर्फे दिला होता पाठिंबा. प्रकल्पग्रस्त्यांचे गावकऱ्यांना आवाहन..
चंद्रपूर:-
घुग्गुस परिसरतील गुप्ता एनर्जी पॉवर लिमिटेड च्या प्रकल्पग्रस्तांना कपंनी मध्ये कामावर न घेता त्यांच्या ऐवजी बाहेरील कामगारांना कंपनीत घेऊन कंपनीने प्रकल्पग्रस्त स्थानिक भूमिपुत्रांना डावलले असल्याने मागील 18 ऑगस्ट पासून कपंनी गेट समोर आंदोलन सुरू केले होते, मात्र कामगार न्यायालयातून आदेश आणून कंपनी प्रशासनाने आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्त आंदोलन कर्ते यांचे आंदोलन 500 मिटर दूर करण्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले होते त्यामुळे आंदोलनाची धार कमी झाली होती, दरम्यान या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार, मनसे जिल्हाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यज महेश वासलवार, जनहीत जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे, शहर अध्यक्ष पियुष धुपे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तूरक्याल, राज वर्मा इत्यादी मनसे पदाधिकारी यांनी आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला होता व सोमवार पासून मनसे कार्यकर्ते या आंदोलनात उतरून मनसे स्टाईल आंदोलन करणार होती, मात्र काल आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्या प्रकल्पग्रस्तांनी काल रात्रीच कंपनीच्या चिमणीवर चढून अभूतपूर्ण आंदोलन रात्री पासूनच सुरू केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
कंपनी प्रशासन व जिल्हा प्रशासन आपल्याला न्याय देत नाही आणि जोपर्यंत आपण आक्रमक आंदोलन करणार नाही तोपर्यंत प्रशासन आपल्या मागण्या मान्य करणार नाही त्यामुळे प्रकल्पग्रस्त कामगाराच्या व स्थानिक तरुणांच्या रोजगारासाठी महेंद्र वडस्कर, भारत खंनके, सभाकर काळे, सुरेंद्र विके, रमेश सोनेकर, अनिल निखाडे, सुनील जोगी आणि उमाकांत देठे हे सर्व या प्लांटच्या चिमणी वर चढून आंदोलन करत आहे, दरम्यान पोलीस फ़ोर्स घटनास्थळी पोहचले असून तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.
आंदोलनकर्त्यांचे आवाहन…
स्थानिक प्रकल्पग्रस्त व स्थानिक मराठी भूमिपुत्राच्या न्याय हक्कासाठी आम्ही आंदोलन करत आहो, आमच्या आंदोलनामुळे निश्चितपणे न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे, त्यामुळे या आंदोलनात सहभागी होऊन समस्त गावकऱ्यांनी कंपनी गेट समोर येऊन समर्थन करावे असे आवाहन आंदोलनकर्ते महेंद्र वडस्कर, भारत खंनके, सभाकर काळे, सुरेंद्र विके, रमेश सोनेकर, अनिल निखाडे, सुनील जोगी आणि उमाकांत देठे यांनी केले आहे.