Home चंद्रपूर गंभीर :- अंत्यसंस्कार करणाऱ्या शांती धाम संस्थेत लाकडाचे टॉल चालविणाऱ्या मुलीवर आत्याचार?

गंभीर :- अंत्यसंस्कार करणाऱ्या शांती धाम संस्थेत लाकडाचे टॉल चालविणाऱ्या मुलीवर आत्याचार?

संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोक वासलवार गप्प तर स्वतःला माजी सैनिक म्हणविणाऱ्या गाडेची दादागिरी मुलीच्या जीवावर बेतणारी?

चंद्रपूर :-

चंद्रपूर शहरातील मागील सन 1996 पासून कार्यरत शांती धाम संस्था ज्या माध्यमातून मृतकांचे अंत्यसंस्कार राहमतनगर ईराई नदी घाटावर केल्या जाते, तिथे आपल्या वडिलांपासून (नरेंद्र गर्गेलवार) अंत्यसंस्कार करिता लाकडं पुरविण्यासाठी लाकडाचा टॉल चालविणाऱ्या स्नेहा गर्गेलवार या मुलीला स्वतःला माजी सैनिक म्हणविणारा संस्थेचा कर्मचारी वाईट नजर ठेऊन तीला त्रास देत आहे, तिचे वडिलांपासून लाकडाचे टॉल शांती धाम संस्थेत करारानुसार किरायाने सुरू आहे, दरम्यान ते हटविण्याचे कारस्थान हरीश गोडे करत असताना त्या मानसिक त्रासामुळे नरेंद्र गर्गेलवार यांचा हृदयविकाराच्या झटक्याने 28/11/2024 रोजी मृत्यू झाला होता, आता जगण्याचे कुठलेही साधन नसल्यामुळे पिडीत मुलीने स्वतः लाकडाचा टॉल सुरू केला, मात्र हरीश गाडे ज्यांचेवर विनयभंगाचा रामनगर पोलीस स्टेधन मध्ये गुन्हा दाखल आहे, त्याने स्वभावानुसार मुलीच्या एकटेपणाचा फायदा घेत आपली वाईट नजर टाकली, पण मुलीने आपल्या वडिलांचा व्यवसाय संघर्ष करून चालवला असताना संस्थेचे अध्यक्ष डॉ. वासलवार व सचिव घनशामसिहं दरबार यांना हाताशी धरून हरीश गोडे यांनी मुलीला त्रास देणे सुरू केले आणि लाकडाच्या धंद्यात आपल्या जवळच्या व्यक्तीला लाकडाचा टॉल मिळवून दिले, परंतु ज्याअर्थी नरेंद्र गर्गेलवार यांच्यासोबत झालेला संस्थेचा करार याबाबत न्यायालयात प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना व संस्थेने मुलीला काम बंद करण्याचे पत्र दिले त्यावर न्यायालयात स्थगिती असताना संस्थेकडून न्यायालयाचा सुद्धा अवमान करून जी दादागिरी सुरू आहे, मुलीकडून सरणावर लाकडं जाऊ नये म्हणून स्वतःचेच लाकडं टाकून मुलीला तिच्या हक्कापासून वंचित केल्या जातं आहे त्याबाबत कितेक वेळा रामनगर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देऊन सुद्धा कुठलीही कारवाई न करता उलट मुलीवर रामनगर पोलीस स्टेशन मध्ये खोट्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आल्याने मुलीकडून या संदर्भात न्यायालयात अवमान याचिका व राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे.

स्नेहा गर्गेलवार ही मुलगी वडिलांचा व्यवसाय स्वतः चालवून एक प्रकारे समाजात आदर्श निर्माण करत आहे, कारण जर मजूर नसले तर स्वतःचं लाकडं सरणापर्यंत पोहचवीत असते, जर प्रेत उशिरा आले तर ती स्वतः उभी राहून मजुराकडून काम करून घेत असतें, पण मुलगी आपल्या मताप्रमाने वागत नाही म्हणून तिच्याकडून लाकडाचा टॉल काढून घेण्यासाठी हरीश गाडे कटकारस्थान करून रामनगर पोलिसांत खोट्या तक्रारी देऊन मुलीला नाहक त्रास देणे सुरू आहे, दरम्यान मुलीने तक्रार दिली तर ती घेतल्या जात नाही मात्र मुलीने स्वतःवर पेट्रोल टाकून मरण्याची धमकी दिली, तुम्हांला फसवतो म्हणून म्हटलं असा कलोकल्पित आरोप करून रामनगर पोलीस स्टेशन मध्ये काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून गुन्हे दाखल करण्यात आले आहे, शिवाय त्या मुलीकडे लाकडं सरणावर टाकण्याचे काम करणाऱ्या तिच्या मजुरांना पोलीस स्टेशन मध्ये नेतो, पोलिसाकडून मारायला लावतो अशा धमक्या हरीश गाडे देतो, त्यामुळे एका मुलीला अशा प्रकारे प्रताडीत करून तिचेवर मानसिक अत्त्याचार होत असल्याने या संस्थेच्या संचालकांसह हरीश गाडे व त्यांनी नोकर ठेवलेल्या चिराग मामीडावर, अविनाश मुंगले व ज्याच्या नावाने बेकायदेशीर टॉल संस्थेकडून दिला गेला त्या जितेंद्र तायडे याचेवर महिला अत्त्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी पत्रकार परिषदेतून स्नेहा गर्गेलवार या मुलीने केली आहे.

शांती धाम संस्थेत भ्रष्टाचार?

शांती धाम संस्थेत मोठा भ्रष्टाचार सुरू असून मागील सन 1996 पासून सन 2020 पर्यंत संस्थेचे ऑडिट केले नाही व ती संस्थाच बंद झाली होती आता तीला जिवंत करून 2020 पासून पाच वर्षाचे ऑडिट कारण्यात आले आहे, पण आजपर्यंत कोट्यावधी रुपयाची उलाढाल झाली असताना सुद्धा संस्थेकडे कुठलाही हिशोब नाही, इथे कर्मचारी मर्जीने काम करतात व पैशासाठी झगडे करतात, या संस्थेला रोटरी क्लब कडून स्वर्ग रथ, आर्यवंश समाजाकडून वैकुंठ रथ, शीख समाजाकडून शीख रथ आहेत, याचे 600/- रुपये दर होते ते आता 1000-1500 रुपये दर घेतात, बाजारात बैंड चा दर हा 1000-1200/- रुपयाला मिळतो तो 2500/- रुपये इथे घेतात, मृतकाच्या परिवाराला नेण्यासाठी किंव्हा आणण्यासाठी मेटॅडोर 1000/- मिळायला हवा तो 2500/- ला दिल्या जातो, संस्थेला देणगी रुपये 500 ते 1000 रुपये घेतात, श्रमिक निधी 300/- ते 400/- रुपये एवढं घेत असताना पुन्हा लाकडं लावण्याचे 200-300/- रुपये सुद्धा घेतात आणि त्यामुळे हरीश गाडे याची अतिरिक्त कमाई होते आणि म्हणून स्नेहा गर्गेलवार हिला जाणीवपूर्वक त्रास देऊन तीचा लाकडाचा टॉल बंद करण्याचे कट कारस्थान सुरू असल्याचा आरोप मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केला आहे, यावेळी पिडीत मुलगी स्नेहा गर्गेलवार यांची उपस्थिती होती.

सेटलमेंट करिता हरीश गाडे यांनी 91 हजार पीडितेकडून घेतले?

हरीश गाडे हा संस्थेचा कर्मचारी जो स्वतःला माजी सैनिक समजतो तो स्नेहा गर्गेलवार हिचेवर अत्त्याचार करत असताना आता त्यांनी स्नेहा गर्गेलवार हिचे कडून 91 हजार रुपये संस्थेसोबत सेटलमेंट करिता घेतले असल्याचा पुराव्यासह आरोप स्नेहा गर्गेलवार यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here